Nashik | निफाड तालुक्यात कादवा नदीच्या पुलावर पुराचा धोका, तरीही वाहतूक सुरू!
निफाड तालुक्यातील पिंपरी-रौळस या रस्त्यावरील कादवा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून देखील एक दुचाकीस्वार अक्षरशः पुराच्या पाण्यात रस्ता पार करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी सांगण्यात येऊन देखील सुद्धा असे जीवघेणे धाडस करताना काही नागरिक दिसत आहे.
नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोयं. काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असूनही पूरस्थिती मात्र कायमच आहे. जिल्हातील अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा देखील संपर्क तुटलायं. पुराचे पाणी नदीच्या (River) पुलावरून वाहत आहे. मात्र, असे असताना देखील लोक जीवाची परवा न करता आणि जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून वाहतूक करताना दिसत आहेत. याचसंदर्भातील निफाड तालुक्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.
कादवा नदीच्या पुलावरून धोकादायक वाहतूक सुरू
निफाड तालुक्यातील पिंपरी-रौळस या रस्त्यावरील कादवा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून देखील एक दुचाकीस्वार अक्षरशः पुराच्या पाण्यात रस्ता पार करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी सांगण्यात येऊन देखील सुद्धा असे जीवघेणे धाडस करताना काही नागरिक दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, चारही बाजूने पाणीच पाणी आहे. पुलावरील रस्ता अजिबात दिसत नसताना देखील एक दुचाकीस्वार तसाच जात आहे.
जिल्ह्यातील सहा धरणे ओव्हरफ्लो
गेल्या दहा दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सहा धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, हरणबारी, केळझर ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी 15 जुलै पर्यंत जेमतेम 28 टक्के असलेला धरणसाठा यंदा 79 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणांमधून केलेल्या पाण्याच्या विसर्गने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आल्याचे दिसून येते. नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या पावसाने नाशिककरांवरील पाणीटंचाईचे मोठे संकट टळले आहे.