AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | आली लहर केला कहर! मनोरुग्ण चक्क इलेक्ट्रिक टॉवरवर, पुढे काय घडलं वाचा!

आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने संपूर्ण घटना रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, स्टेशन मास्टर यांना कळवली. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही. तोपर्यंत लोकांची गर्दी सातत्याने वाढत होती. लोक या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढत होते. मनोरूग्ण टॉवरवरून खाली उतरण्याच्या अगोदर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Nashik | आली लहर केला कहर! मनोरुग्ण चक्क इलेक्ट्रिक टॉवरवर, पुढे काय घडलं वाचा!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 2:44 PM
Share

नाशिक : आज सकाळी कसारा रेल्वे स्थानकाजवळ (Kasara railway station) एक धक्कादायक घटना घडलीयं. सकाळी 7 च्या सुमारस एक मनोरुग्ण मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानका जवळील इलेक्ट्रिक टॉवरवर चढल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमला मिळाली. तोपर्यंत इलेक्ट्रिक टॉवरजवळ (Electric tower) बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. माहिती समजताच आपत्ती व्यवस्थापनची टीम तात्काळ घटनास्थळी पोहचली आणि मदतकार्य सुरू केले. मात्र, काही केल्याने हा मनोरुग्ण (Mental disorder) व्यक्ती इलेक्ट्रिक टॉवरवरच्या खाली येण्याचे नाव घेत नव्हता.

रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीसांनी केले दुर्लक्ष

आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने संपूर्ण घटना रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, स्टेशन मास्टर यांना कळवली. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही. तोपर्यंत लोकांची गर्दी सातत्याने वाढत होती. लोक या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढत होते. मनोरूग्ण टॉवरवरून खाली उतरण्याच्या अगोदर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अखेर अनेक प्रयत्न करून  मनोरूग्णांला टॉवरवरून उतरवले खाली

या मनोरूग्णांला टॉवरवरून खाली कसे उतरवायचे हा मोठा प्रश्न आपत्ती व्यवस्थापनच्या टिमसमोर होता. काहीच मदत मिळत नसल्याचे पाहून आणि मनोरुग्ण ऐकत नसल्याने त्याचा जीव वाचवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीमने एका रेल्वे कर्मचारीच्या मदतीने त्याला आपण चहा प्यायला जाऊ असे खोटे सांगत एक तासाच्या अथक प्रयत्नांनी खाली उतरवले. खाली उतरल्यावर त्याला चहा पाजला आणि नंतर त्या मनोरुग्णाला रेल्वे प्लॅटफॉर्मकडे सोडण्यात आले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.