Nashik Rain | नाशिक जिल्हात पावसाचा हाहा:कार, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन!
महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी गोदाकाठच्या परिसरात येऊन पाहणी देखील केली होती आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा देखील घेतला. तसेच इथल्या व्यावसायिकांना आपले दुकान इतरत्र हलवण्यासाठी निर्देश अगोदरच प्रशासनाकडून दिले होते. गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झालीयं. गंगापूर धरणातून जवळपास दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या जवळपास मानेपर्यंत पाण्याची (water) पातळी वाढली आहे. यामुळे नागरिकांनी सर्तक राहवे असे आवाहन प्रशासनाकडून केले जातंय. इतकेच नाही तर महत्वाचे काम असल्याशिवाय घराच्या बाहेरही पडू नये, असे सांगण्यात आले.
पालिका आयुक्तांनी केली गोदाकाठची पाहणी
महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी गोदाकाठच्या परिसरात येऊन पाहणी देखील केली होती आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा देखील घेतला. तसेच इथल्या व्यावसायिकांना आपले दुकान इतरत्र हलवण्यासाठी निर्देश अगोदरच प्रशासनाकडून दिले होते. गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गंगापूर धरणातून सुरू आहे पाण्याच्या विसर्ग
महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे. गोदा घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाण्याच्या पातळीच अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने नाशिककडे पाठ फिरवल्याने चिंतेचे वातावरण होते. तसेच महापालिका आयुक्तांनी पाणीकपातीचे संकेत देखील दिले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पाणीकपातीचे टेन्शन आता गेले आहे.