अख्ख्या महाराष्ट्रात अशी रंगपंचमी नसेल; गाढवावरुन काढली जाते जावयाची मिरवणूक; ‘त्या’ पाठीमागे हे आहे कारण
रंगपंचमीच्या दिवशी गाढवावरुन जावयाची मिरवणूक काढण्याची परंपरा सिन्नर तालुक्यातील वडांगळी या गावात अनेक वर्षापासून चालत आली आहे. यावेळी वडांगळी गावाचे जे जावई असतात त्यांची गाढवावर बसवून सुपाचे बाशिंग, कांदा लसणाच्या मंडोळ्या, गळ्यात चपलांचा हार याप्रकारे सजवून जावयाची गाढवावर बसवून सगळ्या गावातून मिरवणून काढली जाते.
नाशिकः आपल्या देशात अनेक पद्धतीने सण समारंभ साजरे केले जातात. अनेक रूढी परंपरा इतिहासही सण समारंभामध्ये सांगितला जातो. तसेच वेगवेगळ्या गोष्टींसाठीही आपले सण समारंभ विशेष ठरतात कारण प्रदेशानुसार आणि गावानुसार विविध पद्धतीनेही सण साजरे केले जातात. अशीच एक पद्धत नाशिक जिल्ह्यातील (Nashik) सिन्नर तालुक्यातही आहे. वडांगळी (Wadngali) गावात आगळीवेगळी असणारी ही पद्धत अनोखी ठरते ती रंगपंचमीच्या दिवशी गाढवावरुन जावयाची मिरवणूक काढली जाते म्हणून. अख्या महाराष्ट्रात ही रंगपंचमी (Rangpanchmi) रंगतदार होते ती जावई आणि गाढवावरुन निघणाऱ्या धिंडीमुळे.
रंगपंचमीच्या दिवशी गाढवावरुन जावयाची मिरवणूक काढण्याची परंपरा सिन्नर तालुक्यातील वडांगळी या गावात अनेक वर्षापासून चालत आली आहे. यावेळी वडांगळी गावाचे जे जावई असतात त्यांची गाढवावर बसवून सुपाचे बाशिंग, कांदा लसणाच्या मंडोळ्या, गळ्यात चपलांचा हार याप्रकारे सजवून जावयाची गाढवावर बसवून सगळ्या गावातून मिरवणून काढली जाते.
दर रंगपंचमीची ही परंपरा
गाढवावरुन मिरवणूक काढली जाते त्यापाठीमागे एक लोकपरंपरा आणि लोककथाही आहे. या पद्धतीने जर जावयाची मिरवणूक गाढवावरुन काढली तर पाऊस चांगल्या प्रकारे पडतो. त्यामुळेच या गावात कित्येक वर्षे दर रंगपंचमीला जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्याची परंपरा जपण्यात आली आहे.
गाढवावर बसवूनच मिरवणूक
वडांगळी गावाच्या जावयाची फक्त गाढवावर बसवूनच मिरवणूक काढली जाते असे नाही तर त्या मिरवणुकीनंतर असतो खरा मानाचा कार्यक्रम. गाढवावर बसणं ही सन्मानाची आणि गौरवाची गोष्ट मानली जात नसली तरी वडांगळी गावात मात्र गाढवावर बसून जावयाची मिरवणूक काढली तरी त्यानंतर त्याचा मानपानासह त्याचा मान राखला जातो. गाढवावरुन मिरवणूक काढून झाली की, जावायला अंघोळ घातली जाते, त्याला नवीन कपडे देऊन त्याचा मानसन्मानही ठेवला जातो, आणि चांगला पाऊस पडवा म्हणून निसर्गाकडे मागणीही केली जाते.
संबंधित बातमी
School : दप्तराचं ओझं होणार आणखी कमी, सर्व धडे एकाच पुस्तकात, काय आहे शिक्षण विभागाचा नवा निर्णय?