‘एक तास राष्ट्रवादीसाठी’च्या माध्यमातून घराघरात जाऊन भाजपची पोलखोल करणार; नाशिक जिंकण्यासाठी भुजबळांनी दंड थोपटले

नाशिकचं प्रभारीपद गिरीश महाजन यांच्याकडे देऊन भाजपने नाशिक महापालिकेतील सत्ता राखण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे ‘एक तास राष्ट्रवादीसाठी – आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी – प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी’ ही मोहीम हाती घेऊन भाजपची पोलखोल करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.

'एक तास राष्ट्रवादीसाठी'च्या माध्यमातून घराघरात जाऊन भाजपची पोलखोल करणार; नाशिक जिंकण्यासाठी भुजबळांनी दंड थोपटले
नाशिक जिंकण्यासाठी भुजबळांनी दंड थोपटलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 5:20 PM

नाशिक: नाशिकचं प्रभारीपद गिरीश महाजन (girish mahajan) यांच्याकडे देऊन भाजपने नाशिक महापालिकेतील सत्ता राखण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे ‘एक तास राष्ट्रवादीसाठी – आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी – प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी’ ही मोहीम हाती घेऊन भाजपची (bjp) पोलखोल करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. घराघरात जाऊन राष्ट्रवादीचे (ncp) कार्यकर्ते मतदारांशी संवाद साधणार असून भाजपची पोलखोल करणार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे विचार, कार्यप्रणाली आणि विकास कामेही मतदारांना समजावून सांगणार आहेत. भाजपने नाशिकसाठी कुठली विकासाची कामे केली हा प्रश्नच असून नाशिककरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. याविषयीची सत्यता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घरातघरात जाऊन जनजागृती करावी, असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक तास राष्ट्रवादीसाठी – आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी – प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी’ हा उपक्रम नाशिक शहरातील 44 प्रभागात सुरु करण्यात आला आहे. शहर व ग्रामीण भागामध्ये गावनिहाय तसेच प्रभाग निहाय सेवादल प्रमुख निवडण्यात येऊन त्यांच्या समन्वयाखाली बैठकीचे नियोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत आज नाशिक शहरातील गोविंद नगर प्रभाग क्रमांक 30 येथे माजी खासदार समीर भुजबळ यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, संजय वझरे, अमर वझरे, सागर मोटकरी, सुनील आहिरे, शेखर देशमुख, अमित वझरे, हर्षल खैरनार, साजिद पटेल, श्रीराम वझरे, किरण बडदे, भालचंद्र भुजबळ, धीरज बच्छाव, रवींद्र शिंदे, शिवराज नाईक, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विकासाचं एकही काम नाही

नाशिक शहर व जिल्ह्याचा कायापालट करण्याचे काम आपण केलं आहे. ही विकास कामे जनतेपर्यंत पोचविण्यात यावी. शहरातील प्रत्येक घरात तसेच ग्रामीण भागात प्रत्येक गावात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विचार त्यांनी केलेली विकासाची कामे पोहचवावी. गेल्या पाच वर्षात नाशिक महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. डोळ्यांना दिसेल असे एकही काम झाल्याचे मात्र दिसत नाही. ज्यांनी नाशिक दत्तक घेण्याची भाषा केली. त्यांनीही सफशेलपणे या शहराकडे दुर्लक्ष केले, अशी टीका समीर भुजबळ यांनी केली.

निवडणुकांसाठी मेट्रोचं मृगजळ

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयटी पार्क, मेट्रो सारखे विषय पुढे आणले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कुठलंही काम दिसत नाही. ज्या आयटी पार्कचे स्वप्न दाखविले जात आहे. त्या जागेचे अद्याप भूसंपादन देखील झालेले नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. याला नाशिक शहरातील जनता बळी जाऊ नये यासाठी आपल्याला जनजागृती करण्यावर अधिक भर द्यावा लागेल. सत्यता जनतेच्या समोर मांडवी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

मेट्रो कारशेडची नवी जागा लवकरच घोषित करू, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, वाद संपणार?

VIDEO: राणे पिता पुत्रांची मुंबईत पोलीस ठाण्यात हजेरी, फडणवीस न बोलता का निघून गेले?

‘यशवंत जाधवांनी छगन भुजबळांनाही मागे टाकलं, 100 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग!’, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.