Manmad | मनमाडला झालेल्या मुसळधार पावसाने 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत, नागरिकांचे हाल!
मनमाडला झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका विज पुरवठ्यावर झाला असून नव्याने विकसित झालेल्या भागात तीन दिवसांपासून वीज पुरवठा गायब आहे. विजे अभावी बोअरवेलचे पंप सुरू होत नसल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मुरलीधर नगर भागात ट्रान्सफार्मर मोठ्या प्रमाणावर लोड असल्याने ट्रान्सफार्मर सतत जळतो.
मनमाड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. मात्र, या पावसामुळे काही घरांमध्ये पाणी शिरले, पिकांचे देखील मोठे नुकसान (Damage) झाले आहे. मनमाडला झालेल्या मुसळधार पावसाचा फटका नागरिकांना बसला आहे. पावसामुळे तब्बल गेल्या तीन दिवसांपासून मनमाडमधील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. रात्र नागरिकांना अंधारात काढण्याची वेळ आलीयं. इतकेच नाही तर लाईट (Light) नसल्याने घरामध्ये पाणी देखील नाहीये.
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका
मनमाडला झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका वीज पुरवठ्यावर झाला असून नव्याने विकसित झालेल्या भागात तीन दिवसांपासून वीज पुरवठा गायब आहे. विजे अभावी बोअरवेलचे पंप सुरू होत नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मुरलीधर नगर भागात ट्रान्सफार्मर मोठ्या प्रमाणावर लोड असल्याने ट्रान्सफार्मर सतत जळतो. त्यामुळे माधव नगर ,गणेश नगर शिक्षक कॉलनी, अष्टविनायक नगर,पांडुरंग नगर या भागातील नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित
मनमाड येथे गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. नुकताच मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत, मुले दिवसभर शाळेत असतात. परंतू घरी अभ्यास करण्यासाठी रात्री लाईटच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील मोठे नुकसान होते आहे. वीज पुरवठा कधी सुरळीत होईल, याबाबत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून काहीच सांगितले जात नाहीये. वीज कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता नागरिक करत आहेत.