Nashik | विविध मागण्यांसाठी नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर सर्वपक्षीय नेत्यांकडून आंदोलन…
नाशिक पेठ या राष्ट्रीय महामार्गावर सर्वपक्षीय नेत्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. पेठमधील नागरिकांना टोल माफ करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पेठ ते चाचडगाव या मार्गावरील रस्त्याची ज्याठिकाणी दुरावस्था झाली आहे ते दुरुस्त व्हावे आणि मगच टोल वसूल केला जावा.
नाशिक : नाशिक पेठ या राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) चाचडगाव जवळ असलेल्या टोल नाक्यावर रास्ता रोको करण्यात आले. विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांकडून हे आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने रस्त्यावर (Road) वाहनांच्या मोठं मोठ्या रांगा बघायला मिळाल्या. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन (Movement) करण्यात आले. पेठ ते चाचडगाव यादरम्यान महामार्गाच्या रस्त्याची चाळण झालीयं. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे दूर होणार नाहीत, तोपर्यंत टो माफ करावा ही प्रमुख मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर सर्वपक्षीय नेत्यांकडून जोरदार आंदोलन
नाशिक पेठ या राष्ट्रीय महामार्गावर सर्वपक्षीय नेत्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. पेठमधील नागरिकांना टोल माफ करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पेठ ते चाचडगाव या मार्गावरील रस्त्याची ज्याठिकाणी दुरावस्था झाली आहे ते दुरुस्त व्हावे आणि मगच टोल वसूल केला जावा. या दोन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
रस्त्याचे काम पूर्ण करून मगच या मार्गावर टोल वसुली करावी, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. हे आंदोलन तब्बल दोन तास चालले. आंदोलनादरम्यान महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी यावेळी बघायला मिळाली. मात्र आंदोलनादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. लवकर मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर परत आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.