नाशिकमध्ये पहाटेपासून पावसाची झडझिंबड!

नाशिक शहरात आज मंगळवारी (28 सप्टेंबर) पहाटे पावणेचारपासून पावसाची झडझिंबड सुरू आहे. दिवसभरही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नाशिकमध्ये पहाटेपासून पावसाची झडझिंबड!
नाशिकमध्ये पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे.
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 10:38 AM

नाशिकः नाशिक शहरात आज मंगळवारी (28 सप्टेंबर) पहाटे पावणेचारपासून पावसाची झडझिंबड सुरू आहे. दिवसभरही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Rain starts in Nashik from early morning, possibility of heavy rain in the district)

सप्टेंबर महिन्यात नाशिक शहर आणि जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. गणेशोत्सवच्या दहा दिवसांमध्ये रोज पाऊस सुरू होता. आतापर्यंत गोदावरीला दोनदा पूर आला. नांदगाव या अवर्षणग्रस्त पट्ट्यात न भूतो आणि न भविष्यती, असा पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता पुन्हा पाऊस वाढल्याने शेतातले उरले-सुरले पीकही उद्धवस्त होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार 28 सप्टेंबर रोजी विभागातील नाशिकसह काही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व पूर प्रवण क्षेत्रातील गावांनी सावधानतेच्या अनुषंगाने नदी-नाले काठच्या परिसरातील लोकांनी सतर्क राहावे. नदी व धरण पात्रात कोणी उतरू नये. नागरिकांनी आपले पशुधन, वाहने सुरक्षित स्थळी ठेवावीत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे. दरम्यान, गुलाब चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपून काढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्याला यलो, तर जळगावला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हस्त नक्षत्र सुरू

हस्त नक्षत्राला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी सूर्याने हस्त नक्षात्रात प्रवेश केला. या नक्षत्राचा वाहन घोडा आहे. त्यामुळे खंडित स्वरूपाचा पाऊस होईल. यापूर्वीच्या उत्तरा नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने जोरदार पाऊस झाला, असा अंदाज दाते पंचांगामध्ये वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने जळगावला रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा आपत्ती विभागाच्या पथकांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान सरासरी पेक्षा कमी पावासाची नोंद झाली. मात्र, सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. (Rain starts in Nashik from early morning, possibility of heavy rain in the district)

इतर बातम्याः

नदी बुजविण्याचे कुटील कारस्थान उघड; नाशिकमध्ये नालेही केले गिळंकृत

नाशिक बोर्डः दहावी, बारावी परीक्षा वैयक्तिक देण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत अशी करा नावनोंदणी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.