महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे सक्रिय; 21 सप्टेंबर पासून नाशिक दौऱ्यावर
नाशिक (Nashik) महापालिका निवडणुकीपूर्वी (Municipal Corporation elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) सक्रिय झाले आहेत. येत्या 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान ते नाशकाच्या दौऱ्यावर आहेत.
नाशिकः नाशिक (Nashik) महापालिका निवडणुकीपूर्वी (Municipal Corporation elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) सक्रिय झाले आहेत. येत्या 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान ते नाशकाच्या दौऱ्यावर आहेत. महापालिकेवर पुन्हा एकदा झेंडा फडकाविण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. (Raj Thackeray active before Nashik Municipal Corporation elections; On tour in Nashik from 21st September)
नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गटबाजी तशी जुनीच आहे. या गटबाजीमुळे अनेकांनी पक्ष सोडला. मात्र, अजूनही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरी सुरू असतात. त्यामुळे पक्षाचे कार्यक्रम असो, बैठका असो, की पक्षश्रेष्ठींनी दिलेले आदेश किंवा आंदोलने. एकमेकांना विश्वासात न घेताच त्यांचे नियोजन केले जाते. त्यामुळे राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये विशेष लक्ष घातले आहे. यापूर्वी एकदा त्यांनी नाशिक दौराही केला. त्यानंतर त्यांचे पुत्र अमित ठाकरे, संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, अमेय खोपकर यांनीही नाशिकवारी केली. तेथील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या साऱ्या तयारीनंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष घातल्याने येती महापालिका निवडणूक रंगतदार होणार आहे.
राजगडावर झाली बैठक राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी बुधवारी राजगडावर एक बैठक झाल्याचे समजते. या बैठकीला नाशिकमधून माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, नगरसेवक सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांनी हजेरी लावली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका निवडणुकीत जोरदार आणि एकदिलाने काम करू, असा शब्द यावेळी दिला.
फेब्रुवारीत निवडणुका राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. नववर्षांत पुन्हा एकदा निवडणुकाचा हंगाम असून, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय धुळवडीची रंगत वाढणार आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालकांमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे.
इतर बातम्याः
‘नासाका’चे बॉयलर पेटणार, खासदार पुत्र गोडसेंकडे सारथ्य जायची शक्यता
नाशिकमधल्या 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा; धरणांवर गेल्यास फौजदारी
महावितरणला केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात दिली दीड एकर जमीन, हजारोंच्या घरात प्रकाश