माजी मंत्री पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे यांच्यासह 22 शिक्षकांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण

Nashik Cirme News | नाशिक जिल्ह्यातील राजकारणावर वर्चस्व असणाऱ्या हिरे कुटुंबियांना धक्का बसला आहे. माजी मंत्री पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे यांच्यासह 22 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 106 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नाशिकचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.

माजी मंत्री पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे यांच्यासह 22 शिक्षकांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 2:55 PM

चंदन पुजाधिकारी, नाशिक | 4 नोव्हेंबर 2023 : नाशिकमधील राजकारणातून मोठी बातमी आली आहे. शिक्षकांची नियमबाह्य नियुक्ती करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणात तब्बल 106 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था आणि आदिवासी सेवा समिती संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणाधिकरींनी या नियुक्तीला नियमबाह्यपणे मान्यता दिली. त्यामुळे शासनाला वेतनापोटी लाखो रुपये द्यावे लागल्याचा आरोप आहे. या प्रकरणात या संस्थांचा तत्कालीन संचालक तथा माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे त्यांची चिंरजीव डॉ.अपूर्व हिरे, अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 106 जणांवर गुन्हा दाखल असून त्यात 22 शिक्षक आहेत. नाशिकचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी ही माहिती दिली.

काय आहे हा प्रकार

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था आणि आदिवासी सेवा समिती या संस्थांमध्ये कर्मचारी भरतीसाठी चुकीच्या महितीच्या आधारे प्रस्ताव तयार केले गेले. या प्रस्तावांना शिक्षणाधिकारी यांनी मंजुरी दिली. शिक्षण उपनिरीक्षक डॉ. किरण कुंवर यांनी तक्रार दिल्यानंतर 106 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात संस्था चालक आणि प्राचार्य यांचाही समावेश आहे.

हिरे कुटुंबियांवर गुन्हा दाखल

शासनाच्या फसवणूक प्रकरणात तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री पुष्पाताई हिरे, उपाध्यक्ष पंडित दगा नेरे, कोषाध्यक्ष स्मिता प्रशांत हिरे, सचिव प्रशांत हिरे, सहसचिव दीपक सूर्यवंशी, सभासद डॉ. अपूर्व प्रशांत हिरे, अद्वय प्रशांत हिरे यांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल आहे. पहिला गुन्हा 7 शिक्षक आणि 1 लिपिक, दुसऱ्या गुन्ह्यात 22 शिक्षक 10 लिपिक यांच्यावर आहे.

हे सुद्धा वाचा

पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते आदेश

हिरे कुटुंबियांच्या असलेल्या या दोन्ही संस्थांमधील भरतीसंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अद्वय हिरे यांनी जानेवारी महिन्यात ठाकरे गटात प्रवेश केला होता. दादा भुसे यांनी ठक्कर देण्यासाठी ठाकरे गटाने त्यांना शिवसेनेत घेतले होते.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.