तापाने फणफणत असताना संभाजीराजे आले, कार्यकर्त्यांमध्ये रमले, एल्गार फोडला

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज तब्येत बरी नसताना कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांचा चेहरा पडलेला होता. पण तरीही संभाजीराजे यांनी धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.

तापाने फणफणत असताना संभाजीराजे आले, कार्यकर्त्यांमध्ये रमले, एल्गार फोडला
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 7:22 PM

चैतन्य गायकवाड, Tv9 मराठी, नाशिक : कार्यकर्त्याला दिलेली कमिटमेंट पाळणारी नेतेमंडळी आजही या जगात आहेत. याचं ताजं उदाहरण आज नाशिकमध्ये बघायला मिळालं. नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेच्या मेळाव्यात एक अनोखी गोष्ट बघायला मिळाली. छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आज आजारी असताना पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात दाखल झाले. ते कार्यक्रमाला आले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. पण ते व्यासपीठावर जेव्हा दाखल झाले तेव्हा त्यांचा चेहरा त्यांच्या आजारपणाची जाणीव करुन देत होता. संभाजीराजे यांची सध्या प्रकृती बरी नाही. पण तरीही ते कार्यक्रमात आले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिलगिरी व्यक्त केली, यासोबत कार्यकर्त्यांना काम करण्याचं आवाहन केलं.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील यश लॉन्सवर हा मेळावा पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेची दिशा आणि रणनीती ठरवण्यासाठी हा मेळावा पार पडला. विशेष म्हणजे संभाजीराजे यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी आक्रमकपणे भाषण केलं. “माझ्या अंगात खूप ताप आहे, पण तुमच्यात येऊन मी रमलो”, असं संभाजीराजे आपल्या भाषणात म्हणाले.

संभाजीराजेंनी व्यक्त केली दिलगिरी

“मी दिलगिरी व्यक्त करतो की, मला जोशात बोलता येणार नाही. मी दिलेला शब्द पाळतो, म्हणून आज आलोय. मीडीयाला टीआरपीसाठी आज काही मिळणार नाही. मी कुणाचं कौतुक करण्यासाठी आज बोलणार नाही. हॉल भरवणे फार सोपं असतं. पण तुमच्याकडून काहीतरी आऊटपुट मिळालं पाहिजे. कुठल्याही राज्यात आपल्या एवढा इतिहास पाहायला मिळत नाही”, असं संभाजीराजे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“दुसऱ्या पक्षाच्या तुलनेत आपल्याकडे तेवढे साधन नाही. पण आपल्याला निश्चितच काहीतरी वेगळं घडवावे लागेल. तुम्ही लेखन करा, वाचन करा. आपल्या देशात, राज्यात शिक्षणावर किती खर्च केला जातो? आपलं खेळात काय योगदान आहे? दुसऱ्या छोट्या राज्यांचे योगदान पाहा”, असं संभाजीराजे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

“शेतकऱ्यांच्या पॉलिसीत आजही काही बदल नाही. सगळ्यात जास्त किल्ले नाशिकमध्ये आहेत. राजकीय लोकांना माझं आव्हान आहे की, तुम्ही किल्ल्यांसाठी काय केले? मी रायगड साठी भांडलो. तुम्ही का नाही करत?”, असा सवाल संभाजीराजे यांनी केला.

संभाजीराजे यांचा कार्यकर्त्यांना सवाल

“महाराष्ट्रात खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे. शब्दफेक याची एक लेव्हल होती. एक माणूस सुद्धा हा बदल करू शकतो. स्वराज्यातील एक-एक सदस्याने ठरवले पाहिजे की, मला काहीतरी करायचं आहे. स्वराज्याची भूमिका कशी मांडणार, यावर तुमची चर्चा आहे का?” असा प्रश्न संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना विचारला.

संभाजीराजे लोकसभेची निवडणूक लढवणार?

“तुम्ही दाखवा तुम्ही काय-काय काम केलं ते, तुम्ही मला थेट भेटू शकता. जो स्वराज्यसाठी राबतो, त्याच्यासाठी संभाजीराजे आहे. नाशिक हा सगळ्यात ताकदवान जिल्हा आहे. त्याची चर्चा दिल्लीत देखील आहे. चर्चा ही आहे की, संभाजीराजे नाशिकमधून लोकसभा लढवतील. मी अजून काहीही ठरवलं नाही. मला विश्वास नाही की, नाशिकरांना मी पाहिजे आहे का?”, असं मोठं वक्तव्य संभाजीराजे यांनी केलं. “ज्यावेळी एक-एक सदस्य ग्रामीण भागात पोहचेल, त्यावेळी मी ठरवेल”, असंदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

‘चार पैसे कमवा, मग स्वराज्याच्या मागे फिरा’

“संभाजीराजे एक चेहरा आहे, म्हणून मागेमागे पळत राहणे, हे देखील चुकीचं आहे. आपण 2024 ला उतरायचं, यात काही दुमत नाही. कॉपी करून स्वराज्यातला सेवक आम्हाला नकोय. शंभर टक्के काम करणारा माणूस हवाय. तुम्ही 100 पैकी 20 टक्के मिळवा, पण प्रामाणिकपणे मिळवा. मला कधीही आयुष्यात 75 टक्क्यांच्यावर मार्क मिळाले नाही. चार पैसे कमवणे, मग स्वराज्याच्या मागे फिरा”, असा सल्ला संभाजीराजे यांनी यावेळी दिला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.