Sanjay Raut: “आता वाघाची गरूड झेप, महाराष्ट्र शिवसेनेच्या कवेत येणार”, संजय राऊतांना विश्वास

Shivsen : आता वाघाची गरूड झेप, महाराष्ट्र शिवसेनेच्या कवेत येणार, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

Sanjay Raut: आता वाघाची गरूड झेप, महाराष्ट्र शिवसेनेच्या कवेत येणार, संजय राऊतांना विश्वास
संजय राऊत Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 11:48 AM

नाशिक : आमदारांपाठोपाठ आता बंडखोरांमध्ये नगसेवकांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबवली आणि पुणे येथील नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी होत आहे. मात्र, हे नगरसेवक नाहीतर माजी नगरसेवक असा उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. या महापालिकांवर आता प्रशासकाची नेमणूक झाली आहे. त्यामुळे जे गेले ते नगरसेवक नव्हते. शिवाय अशा अफवा पसरु नका असा सल्ला देऊन आता सर्व राज्य आपल्यासाठी रिकामे आहे. त्यामुळे वाघ आता गरुड झेप घेणार आणि महाराष्ट्र शिवसेनेच्या (Shivsena) कवेत येणार, असे म्हणत शिवसेना ही पक्ष संघटनेवरच भर देणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत.

शिवसेनेच्या कवेत महाराष्ट्र

आता सर्व राज्य आपल्यासाठी रिकामं आहे. त्यामुळे वाघाच्या झेपेत महाराष्ट्र कवेत घेण्यासाठी शिवसेना पुढे आली आहे, असं म्हणत शिवसेना ही पक्ष संघटनेवरच भर देणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

सेनेला फुटीचं ग्रहण

शिवसेना पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे रोज नवे उपक्रम घेऊन पदाधिकारी, नगरसेवक आणि आमदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असताना दुसरी शिवसेनेला लागलेली गळती ही कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमदारांचे बंड हे काही प्रमाणात का थंड झाले असले तरी हे बंडाचे लोण नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत येऊन ठेपले आहे. नवी मुंबई, पुणे पाठोपाठ आता कल्याण-डोंबवली महापालिकेतील तब्बल 55 पेक्षा जास्तीच्या नगरसेवकांनी बंड केले आहे. हे नगरसेवक आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे केवळ आमदारच नाहीतर आता नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना रोखण्याचे आव्हान ठाकरेंच्या समोर असणार आहे.

55 पेक्षा अधिक नगरसेवकांचा सहभाग

राज्यातील महापालिका निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. असे असताना शिवसेनेला जय महाराष्ट्र करणाऱ्या आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसाकाठी शेकडो नगरसेवक हे पक्ष सोडून शिंदे गटात सहभागी होत आहेत. कल्याण-डोंबवली महापालिकेतील तब्बल 55 हून अधिक नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.