संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण, नाशिकमधील अवनखेडला पहिलं पारितोषिक

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायतींना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पुरस्कार प्रदान करण्यात आले.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण, नाशिकमधील अवनखेडला पहिलं पारितोषिक
Gram Swachchhata Abhiyan Award distribution
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 10:39 PM

नाशिक : महाराष्ट्र राज्याला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संतांनी अभंग, श्लोक, ओव्यांच्या माध्यमातून आयुष्य कसे जगावे याची शिकवण संपूर्ण जगाला दिली आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यासारख्या संतांनी आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. संतांची शिकवण आचरणात आणल्यास आपला महाराष्ट्र स्वच्छतेत आणि कोरोनामुक्तीत अव्वल राहील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2017-18 च्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेत्या ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. (Sant Gadge Baba Gram Swachchhata Abhiyan Award for clean village distribution, Chhagan Bhujbal, Ajit Pawar were Present)

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सन 2017-18 अंतर्गत अवनखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक या ग्रामपंचायतीस प्रथम, लोणी बु. ता. राहता, जि. अहमदनगर या ग्रामपंचायतीस द्वितीय तर कुशेवाडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग या ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. नाशिक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अवनखेड ग्रामपंचायतीस पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सोहळ्यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, अप्पर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, सहसचिव अभय महाजन, जलजीवन मिशन अभियान संचालक हृषीकेश यशोद आदी मान्यवर वर्षा या शासकीय निवासस्थानाहून उपस्थित होते तर उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिकहून दूर दृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, अहमदनगर व गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच तसेच विजेती ग्रामपंचायत ज्या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये येते त्या पंचायत समितीचे सभापती या सोहळ्यास जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

नाशिकमधील अवनखेड राज्यात प्रथम

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2017-18 अंतर्गत अवनखेड ( ता. दिंडोरी, जि. नाशिक) या ग्रामपंचायतीस 25 लाख रुपयांचा प्रथम क्रमांकाचा, लोणी बुद्रूक (ता. राहता, जि. अहमदनगर) या ग्रामपंचायतीस 20 लाख रुपयांचा द्वितीय तर कुशेवाडा (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) या ग्रामपंचायतीस 15 लाख रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.

इतर बातम्या

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने गरीबांच्या शिक्षणासाठी भरीव योगदान द्यावे : छगन भुजबळ

तिसरी लाट तिशीच्या आतील तरुणांसाठी धोकादायक; टास्क फोर्सच्या हवाल्याने अजित पवारांचा इशारा

‘चंद्रकांतदादांना हल्ली काही सूचत नाही’, सीबीआय चौकशीच्या ठरावावर अजित पवारांचा टोला

(Sant Gadge Baba Gram Swachchhata Abhiyan Award for clean village distribution, Chhagan Bhujbal, Ajit Pawar were Present)

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.