नाशिकमधील इगतपुरी ग्रामीण रुग्णालय ‘व्हेंटिलेटर’वर, कोसळणाऱ्या छतामुळे रुग्णांचा जीव टांगणीला
सर्वसामान्यांना परवडेल असे उपचार होण्यासाठी इगतपुरी येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. सुरुवातीला मिळणाऱ्या चांगल्या सुविधांमुळे येथील रुग्णांवर उत्तम उपचार केले जात होते. सद्य:स्थितीतही उपचार चांगले होत असले, तरी भिंतीवरुन पडणारे पावसाचे पाणी, लोंबकळणारे स्विच अन् वायरिंगमुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शैलेश पुरोहित, नाशिक : सर्वसामान्यांना परवडेल असे उपचार होण्यासाठी इगतपुरी येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. सुरुवातीला मिळणाऱ्या चांगल्या सुविधांमुळे येथील रुग्णांवर उत्तम उपचार केले जात होते. सद्य:स्थितीतही उपचार चांगले होत असले, तरी भिंतीवरुन पडणारे पावसाचे पाणी, लोंबकळणारे स्विच अन् वायरिंगमुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकीकडे कोरोनाच्या तिसरी लाट थोपवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असल्याचा दावा केला जातोय. तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना होणार असल्याचे सांगितले जातंय. असं असताना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात बालगृहातील छताचा स्लॅब खाली कोसळत आहे. त्यामुळे रुग्णांमधील भिती अधिक गडद झाली आहे. बाल गृहाबरोबरच ऑपरेशन थिएटर, प्रसूती गृह, जनरल वार्ड, औषध गृहाचीही हीच परिस्थिती आहे.
VIDEO: नाशिकमधील इगतपुरी ग्रामीण रुग्णालय ‘व्हेंटिलेटर’वर, कोसळणाऱ्या छतामुळे रुग्णांचा जीव टांगणीला@rajeshtope11 @OfficeofUT @CMOMaharashtra #GovernmentHospital #Igatpuri #Nashik pic.twitter.com/dLKSmNRmyA
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 25, 2021
गोरगरीबांसाठी उपचाराचं हक्काचं ठिकाण, मात्र, आता भितीच्या सावटाखाली उपचार
प्रसूतीगृह, बालरोग, ऑर्थोपेडिक, सर्व प्रकारच्या जनरल शस्त्रक्रियांसह येथे उपचार केले जातात. सर्व उपचार नाममात्र शुल्कांमध्ये होत असल्याने येथे रुग्णांची नेहमीच वर्दळ असते. दैनंदिन ओपीडीद्वारे 150 ते 200 रुग्णांवर उपचार केले जातात. तर 70 ते 80 निवासी रुग्णांवर उपचार केले जातात. यामध्ये प्रामुख्याने गोरगरीबांची संख्या लक्षणीय असते. खासगी हॉस्पिलमध्ये उपचारांसाठी लागणारा भरमसाठ खर्च अधिक असल्याने शहरातील अनेक कनिष्ठ मध्यमवर्गीय ग्रामीण रुग्णालयाचा आधार घेतात. पण येथील परिस्थितीवरून येथे येणारे सर्व रुग्ण भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे चित्र आहे.
“रुग्णालयाच्या भिंतींवर लोंबकळणारी वायरिंग, लाईटच्या ट्यूब कोणत्याही क्षणी खाली पडण्याची शक्यता”
रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या अनेक भिंतींवर वायरिंग लोंबकळत असून लाईटच्या ट्यूब कोणत्याही क्षणी खाली पडण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी भिंतीवरुन खाली पडत असल्याने रुग्णालयाच्या आवारात अनेक ठिकाणी पाणी साचते . तर बालगृहातील स्लॅबच्या छताचा ढपला पडल्यामुळे रुग्णामध्ये अधिकच भिती निर्माण झाली आहे. सुदैवाने काही दिवसांपूर्वी स्लॅबच्या छताचा ढपला पडताना बालगृह विभागात रुग्ण नसल्याने अनर्थ टळला असला तरी यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
प्रस्ताव पास, टेंडरही निघाले, पण सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त
सार्वजनिक बांधकाम विभागाला सुविधांसाठी रुग्णालयाच्यावतीने अनेकदा पत्रव्यवहार केला गेला आहे. प्रस्तावही पास झाला, टेंडरही निघाले, पण सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त आहे. दरम्यान, बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा :
दुसरा डोस मिळणं कठीण, नाशिकमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्यानं ज्येष्ठ नागरिकांवरही भटकंतीची वेळ
‘अहो… मी बाप गमावला, आता तरी आरोग्य यंत्रणा सुधारा’, वर्ध्यात तरुणीचा आक्रोश
VIDEO: ते रात्रभर बेडसाठी गाडी घेऊन शहरभर फिरत राहीले, शेवटी गाडीतच मृत्यू, नगरची भयंकर कोरोना स्थिती
व्हिडीओ पाहा :
Serious condition of Igatpuri rural hospital Nashik patient life in risk