उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के, एकनाथ शिंदे यांना उघडपणे पाठिंबा देत जिल्हा प्रमुखाचा थेट राजीनामा

सुनील पाटील यांनी फेसबुक पोस्ट टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय.

उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के, एकनाथ शिंदे यांना उघडपणे पाठिंबा देत जिल्हा प्रमुखाचा थेट राजीनामा
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 11:54 PM

गिरीश गायकवाड, नाशिक : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय. खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर काही तासांपूर्वी महत्त्वाची माहिती दिली होती. ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली होती. त्यानंतर भाऊसाहेब चौधरी यांच्या समर्थनार्थ सुनील पाटील यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिलाय.

सुनील पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय. “आमचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या समर्थनार्थ माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय”, असं सुनील पाटील फेसबुकवर म्हणाले आहेत.

सुनील पाटील नेमकं काय म्हणाले?

हे सुद्धा वाचा

“माझा शिवसेना उद्धव गटाचा राजीनामा. मी सुनील पाटील, शिवसेना (उद्धव गट) नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख आमचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या समर्थनार्थ माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय”, असं सुनील पाटील यांनी म्हटलंय.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो. हम नाशिककर आपके साथ है”, असं देखील सुनील पाटील म्हणाले आहेत.

भाऊसाहेब चौधरी नागपुरात दाखल

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केलेले नाशिकचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी हे नागपुरात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. भाऊसाहेब यांचा उद्या एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात जाणं हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासाठी मोठा झटका मानला जातोय. आतापर्यंत संपूर्ण नाशिक शहरातील नगरसेवक ठाकरे गटाचे असल्याचा दावा केला जात होता. पण गेल्या आठवड्यात शिंदेंनी 13 नगरसेवक फोडले. त्यानंतर आता जिल्हा संपर्क प्रमुख आणि संपर्क प्रमुखालाही आपल्याकडे वळण्यात शिंदेंना यश आलंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.