AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kashmir Files च्या शो दरम्यान नाशिकमध्ये महिलांचा गोंधळ; भगवी शाल घालून प्रवेश नाकारल्याने घोषणाबाजी

नाशिकमध्ये बुधवारी द काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या शो दरम्यान पीव्हीआर सिनेमामध्ये गोंधळ झाला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावणरण होते. मात्र, परस्पर सामंजस्याने या वादावर पडदा टाकण्यात आला. या प्रकरणी अजूनपर्यंत तरी पोलिसात कसलिही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

The Kashmir Files च्या शो दरम्यान नाशिकमध्ये महिलांचा गोंधळ; भगवी शाल घालून प्रवेश नाकारल्याने घोषणाबाजी
नाशिकमध्ये द काश्मीर फाइल्सच्या शो दरम्यान गोंधळ निर्माण झाला होता.
| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 4:54 PM
Share

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) बुधवारी द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपटाच्या शो दरम्यान पीव्हीआर सिनेमामध्ये (PVR Cinema) गोंधळ झाला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावणरण होते. एका महिला प्रेक्षकाला भगवी शाल घालून चित्रपटगृहात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे महिला प्रेक्षक जोरदार आक्रमक झाल्या. त्यांनी स्वतः सुरक्षारक्षकांना जाब विचारला. यावेळी इतर महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, काही वेळात हे प्रकरण परस्पर सामंजस्याने मिटवण्यात आले. दुसरीकडे दोनच दिवसांपूर्वी असाच एक प्रकार आदिलाबादमध्ये घडला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एक प्रेक्षक पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होता. त्याला इतर प्रेक्षकांनी बदडून काढल्याची घटना घडली होती. मात्र, याची सत्यता अजून पटलेली नाही. त्यातच नाशिकमधला हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या शोने विनाकारण पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे.

नेमके प्रकरण काय?

नाशिकमधील सुप्रसिद्ध अशा कॉलेजरोडवरील पीव्हीआर सिनेमा चित्रपटगृहात बुधवारी द काश्मीर फाइल्स चित्रपटाचा शो खास महिलांसाठी आयोजित केला होता. या शोसाठी महिलांनी तुफान गर्दी केली होती. मात्र, तितक्यात एक महिला भगवी शाल परिधान करून आली. या महिलेला चित्रपटगृहात जाण्यास सुरक्षारक्षकांनी नकार दिला. त्यामुळे महिलेने कारण विचारले. महिला आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. या प्रकाराने तिथे उपस्थित असलेल्या महिलांही आक्रमक झाल्या. त्यामुळे गोंधळ वाढला. महिलांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. काही काळ वातावरण तापले होते. मात्र, सामंजस्याने हे प्रकरण मिटवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत काही तक्रार नोंदवण्यात आली नाही.

चित्रपटावरून दोन गट

द काश्मीर फाइल्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करतोय. रोज एक विक्रम मोडतो आहे. चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहे. त्यात अनेक पालक आपल्या लहान मुलांना चित्रपट दाखवायला घेऊन येत आहेत. मात्र, हा चित्रपट विशेष म्हणजे हा चित्रपट ए ग्रेडचा असल्याने तो 18 वर्षांचे वय असलेल्यांनाच पाहायला परवानगी आहे. त्यामुळे अनेक पालकांना आपल्या मुलांना एक तरी घराकडे वापस पाठवून द्यावे लागत आहे किंवा सर्वांनाच घरचा रस्ता धरावा लागत आहे. दुसरीकडे या चित्रपटावरून दोन गट पडलेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटामुळे इतक्या दिवस दाबून ठेवलेला खरा इतिहास समोर आल्याचे म्हटले आहे. मात्र, विरोधकांनी हा चित्रपट एकतर्फी बनवल्याचा आरोप केला आहे.

इतर बातम्याः

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.