Nashik | चक्क गरोदर महिलेला रस्ता नसल्याने दवाखान्यात झोळी करून नेले, नाशिकच्या हातपाडा येथे घटना, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…
हातपाडा येथील एका गरोदर महिलेला दवाखान्यात झोळी करून नेण्यात आले. यासंदर्भातील व्हिडीओ आता सोशल मिडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. ग्रामस्थांनी कशाप्रकारे झोळी तयार करून महिलेला दवाखाण्यात दाखल केले.
नाशिक : नाशिकच्या (Nashik) त्रंबकेश्वर हातपाडा येथे एक धक्कादायक घटना घडलीयं. चक्क एका गरोदर महिलेला रस्ता नसल्याने दवाखान्यात झोळी करून नेण्याची वेळ आलीयं. गरोदर महिलेला अचानक कळा सुरू झाल्याने तिला दवाखान्यात घेऊन जात असताना रस्ता नसल्याने कुटुंबियांनी ब्लँकेटची झोळी करत महिलेला दवाखान्यात (Hospital) पोहचवले. हातपाडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची समस्या आहे. यासंदर्भात अनेकदा ग्रामस्थांनी प्रशासनाला रस्ते तयार करून देण्यासाठी पत्र व्यवहार केले. मात्र, अजूनही रस्ते (Road) तयार करून न दिल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोयं.
हातपाडा येथील गरोदर महिलेला दवाखान्यात झोळी करून नेले
हातपाडा येथील एका गरोदर महिलेला दवाखान्यात झोळी करून नेण्यात आले. यासंदर्भातील व्हिडीओ आता सोशल मिडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. ग्रामस्थांनी कशाप्रकारे झोळी तयार करून महिलेला दवाखाण्यात दाखल केले, हे सर्व व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते आहे. आता व्हिडीओ सोशल मीडियावरती चर्चेचा विषय बनतो आहे. हा व्हिडीओ हातपाडा ग्रामस्थांनीच सोशल मिडियावर व्हायरल केल्याचे देखील सांगितले जात आहे.
प्रशासनाकडून व्हिडिओची सत्यता पडताळून दखल घेण्याची गरज
हातपाडा येथील गरोदर महिलेला झोळी करून दवाखाण्यात दाखल केल्याचा व्हिडीओ जरी व्हायरल झाला असला तरीही प्रशासनाकडून व्हिडिओची सत्यता पडताळून दखल घेण्याची गरज आहे. या पूर्वीही हातपाडा येथील रस्त्याच्या समस्या दाखवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते. स्वांतत्र्याच्या 75 वर्षांनंतरही रस्ता नाही हे चित्र खरोखरच अत्यंत दुर्दैवीच आहे.