पाझर तलावाचे पाणी शेतात घुसले, दहा एकरांवरील लाखोंचे पीक वाहून गेले

पाझर तलावाचे पाणी शेतात घुसून आठ शेतकऱ्यांच्या दहा एकर शेतातील पीक (Crop damag) वाहून गेले आहे. येवला तालुक्यातील आंबेगावमध्ये (Nashik yeola) पाझर तलावाला (Lake water) सांडवा काढायला दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली आहे.

पाझर तलावाचे पाणी शेतात घुसले, दहा एकरांवरील लाखोंचे पीक वाहून गेले
तलावाचे पाणी शेतात घुसून नुकसान.
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 4:51 PM

नाशिकः पाझर तलावाचे पाणी शेतात घुसून नऊ शेतकऱ्यांच्या दहा एकर शेतातील पीक (Crop damag) वाहून गेले आहे. येवला तालुक्यातील आंबेगावमध्ये (Nashik yeola) पाझर तलावाला (Lake water) सांडवा काढायला दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली आहे. येत्या आठ दिवसांत सांडवा काढला नाही, तर आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी (Farmer) दिला आहे.  (The water from the lake seeped into the fields, carrying away millions of crops on ten acres)

येवला तालुक्यातील आंबेगाव येथील रतन सोनवणे यासह आठ शेतकऱ्यांची शेती येवला-निफाड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या पाझर तलावाजवळ आहे. गेल्या तीस वर्षांपूर्वी पाणी आडवा – पाणी जिरवा या संकल्पनेतून या पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत दर पावसाळ्यात पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते, पण पाझर तलावाला सांडवा नसल्याने पाण्याचा विसर्ग होत नाही. त्यामुळे गेल्या तीस वर्षांपासून आजपर्यंत दरवर्षी पावसाळ्यात शेतकरी रतन विठ्ठल सोनवणे (गट क्रमांक 328, 329) कुसुम रतन सोनवणे (गट क्रमांक 328), दत्तात्रय रतन सोनवणे (गट क्रमांक 328), विजय रतन सोनवणे (गट क्रमांक 328), मोहन रतन आव्हाड (गट क्रमांक 298), जनार्दन सयाजी सोनवणे (गट क्रमांक 323), बाबूराव रामजी सोनवणे (गट क्रमांक 327), बाळू अर्जुन सोनवणे (गट क्रमांक ३२४), कचरू अर्जुन सोनवणे (गट क्रमांक 325) यांच्या शेतातील मका, टोमॅटो, सोयाबीन, द्राक्ष यासह इतर पिकाचे मोठे नुकसान होते आहे.

बँकेचे कर्ज कसे फेडणार

आठ शेतकऱ्यांच्या दहा एकर पिकात दरवर्षी पाझर तलावाचे पाणी शिरते. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन तलावाला सांडवा काढून देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करावा, बँकेचे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पिके खराब होत असल्याने या शेतकऱ्यांनी येवला तहसील कार्यालयात जाऊन आपली व्यथा मांडली.

थेट मुख्यमंत्र्यांनाही साकडे

शेतकऱ्यांनी तहसीलदारांसमोर आपली व्यथा मांडलीच. सोबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या प्रकरणी लक्ष घालून तातडीने पाझर तलावाला सांडवा काढून द्यावा, शेतीचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी केली आहे. येत्या आठ दिवसांत पाझर तलावाला सांडवा काढून नाही दिल्यास सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा या शेतकरी कुटुंबांनी दिला आहे. (The water from the lake seeped into the fields, carrying away millions of crops on ten acres)

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.