Nashik | नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे एकाच रात्री तब्बल 6 दुकानांमध्ये चोरी, संपूर्ण प्रकार सीसीटिव्हीत कैद
नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे एकाच रात्री सहा चोरीच्या घटना घडल्याने मोठी खळबळ उडालीयं. या प्रकारानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण अजून पोलिसांसमोर मोठे आवाहन आहे. चोरी करतानाचा संपूर्ण प्रकार हा सीसीटिव्हीत कैद झाला असल्याने चोरांना पकडण्यात पोलिसांना मदत होणार आहे.
नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे येथे एक धक्कादायक घटना घडलीयं. एकाच रात्रीत तब्बल सहा दुकानांमधून चोरी करण्यात आलीयं. या घटनेनंतर पोलिसांची आणि व्यापाऱ्यांची झोप उडालीयं. रात्रीच्या सुमारास दुकानांचे शटर वाकवून या चोऱ्या करण्यात आल्यात. विशेष म्हणजे चोरीचा (Theft) हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्हीत कैद झालायं. आता या सीसीटिव्ही फुटेजवरून चोरांना पकडण्याचे मोठे आव्हानच पोलिसांसमोर (Police) उभे आहे. रात्रीच्या वेळी बाजार पेठेमधील लाईट सतत जात असल्याने एवढ्या चोऱ्या झाल्याचे देखील सांगितले जात आहे.
संपूर्ण प्रकार सीसीटिव्हीत कैद
नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे एकाच रात्री सहा चोरीच्या घटना घडल्याने मोठी खळबळ उडालीयं. या प्रकारानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण अजून पोलिसांसमोर मोठे आवाहन आहे. चोरी करतानाचा संपूर्ण प्रकार हा सीसीटिव्हीत कैद झाला असल्याने चोरांना पकडण्यात पोलिसांना मदत होणार आहे.
6 ते 7 जणांच्या टोळीने केली चोरी
नांदूर शिंगोटे येथील स्थानिक दुकानदारांनी सांगितले की, या चोऱ्या काही दोन ते तीन चोरांनी मिळून केल्या नसून तब्बल 6 ते 7 जणांच्या टोळीने मिळून 6 दुकाने फोडली आहेत. अचानक मुख्य बाजारपेठेत 6 ते 7 जणांच्या टोळी येऊन दुकाने फोडते, तेंव्हा पोलिस काय करतात? असा सवाल व्यापारी उपस्थित करत आहेत.
रात्री-अपरात्री लाईट नसल्याने चोरींच्या घटनेमध्ये वाढ
रात्री-अपरात्री लाईट बाजारपेठेत नसल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोयं. सध्या पावसाळा असल्याने शहरात रात्रीच्या वेळी लाईट जाण्याच्या घटनेमध्ये वाढ झालीयं. यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदार वर्तवला जातोयं. या संपूर्ण प्रकरणानंतर स्थानिकांनी पोलीसांची गस्त वाढविण्याची मागणी केलीयं.