Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court : कुठल्याही योजनांच्या घोषणा करण्याआधी बजेट विचारात घ्या; सुप्रीम कोर्टाचा सरकारांना सल्ला

कुठल्याही सरकारी योजनेची घोषणा करण्याआधी त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा निधी आहे का? तुमचे तेवढे बजेट आहे का? याचा विचार करा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. घोषणा आणि अंमलबजावणी यात मोठी तफावत दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले.

Supreme Court : कुठल्याही योजनांच्या घोषणा करण्याआधी बजेट विचारात घ्या; सुप्रीम कोर्टाचा सरकारांना सल्ला
‘लिव्ह-इन’मध्ये जन्मलेल्या मुलाचा पित्याच्या संपत्तीवर हक्कImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 10:25 PM

नवी दिल्ली : राज्ये तसेच केंद्र सरकारकडून विविध सरकारी योजनांची घोषणा (Announcement) केली जाते. अनेकदा त्यातील बर्‍याच योजना निधीअभावी किंवा अन्य कारणांमुळे कागदावरच राहतात. परिणामी, त्या योजना म्हणजे जनतेला दिलेले पोकळ आश्वासन ठरते. अशाप्रकारच्या घोषणांना लगाम घालण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्व राज्ये आणि केंद्र सरकारला नियोजनाचा डोस पाजला. कुठल्याही सरकारी योजनेची घोषणा करण्याआधी त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा निधी आहे का? तुमचे तेवढे बजेट आहे का? याचा विचार करा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. घोषणा आणि अंमलबजावणी यात मोठी तफावत दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले. (Consider the budget before announcing any plans Supreme Court advises governments)

सरकारी योजनांच्या घोषणांना लगाम घालण्याच्या अनुषंगाने सल्ला

न्यायमूर्ती यू.यू. ललित, न्यायमूर्ती एस.आर. भट आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठापुढे आज एका प्रकरणाची सुनावणी झाली. अत्याचारग्रस्त महिलांना कायदेशीर मदत देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित कराव्यात, यासंदर्भात न्यायालयाने सरकारांना निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने वारेमाप सरकारी घोषणांना लगाम घालण्याच्या अनुषंगाने सरकारांना सल्ला दिला, असे लाईव्ह हिंदुस्तानने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

शिक्षण हक्क कायद्याचे काय झाले? शाळा कुठेत? शिक्षक कुठेत?

सरकारने कुठल्याही योजनेची घोषणा करण्यापूर्वी त्या योजनेच्या आर्थिक परिणामांचा विचार केला पाहिजे. आम्ही तुम्हाला शिक्षण हक्क कायद्याचे उत्कृष्ट उदाहरण देतो. तुम्ही शिक्षण हक्क कायदा बनवलात, परंतु शाळा कुठे आहेत?, असा खडा सवाल यावेळी न्यायमूर्तींनी उपस्थित केला. जेव्हाही तुम्ही अशा योजना किंवा कल्पना आणता, तेव्हा नेहमी आर्थिक परिणाम लक्षात घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

केंद्र सरकारने मांडली बाजू

सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारीमध्ये अत्याचारग्रस्त महिलांच्या सोईसुविधांबाबत सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने केंद्राला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. त्यात कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्यांतर्गत विविध राज्यांनी उचललेल्या पावलांचा तपशील सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते. त्यावर बुधवारच्या सुनावणीवेळी केंद्र सरकारच्या वतीने उपस्थित राहिलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाच्या आधीच्या निर्देशानुसार तपशील देण्यासाठी काही वेळ देण्याची विनंती त्यांनी खंडपीठापुढे केली. खंडपीठाने त्यांच्या विनंतीची दखल घेतली. (Consider the budget before announcing any plans Supreme Court advises governments)

इतर बातम्या

‘INS विक्रांत’ हा सर्वात मोठा घोटाळा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, संजय राऊत आक्रमक

Shocking : जेवणाच्या पैशांवरुन तुफान राडा, 17 जणांकडून जीवघेणा हल्ला! कामोठ्यातील धक्कादायक घटना

'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.