AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai : नवी मुंबईत नववर्षाच्या पूर्वसंध्येला ड्रग्ज कारवाई, तीन आरोपींना अटक

नवीन वर्षांच्या पार्ट्यांसाठी या अंमली पदार्थांचा पुरवठा केला जाणार होता. तर शॉर्टकट पैसे मिळवण्यासाठी सुभाष पाटील या आरोपीने पनवेल परिसरात दोन महिन्यापूर्वी ड्रुग्स फॅक्टरी टाकली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Navi Mumbai : नवी मुंबईत नववर्षाच्या पूर्वसंध्येला ड्रग्ज कारवाई, तीन आरोपींना अटक
नवी मुंबईत नववर्षाच्या पूर्वसंध्येला ड्रग्ज कारवाई
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 11:58 PM
Share

नवी मुंबई : नवीन वर्षाच्या तोंडावर साजऱ्या केल्या जाणाऱ्या पार्ट्यांसाठी ड्रुग्स पुरवठा करणाऱ्या आरोपींना नवी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखा पोलीस आणि अंमलीपदार्थ विरोधी कक्ष व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष यांनी संयुक्तरित्या कारवाई करून अंमली पदार्थ ताब्यात घेतले आहेत. 31 डिसेंबरच्या पार्ट्यांना तरुणांना ड्रुग्स विक्रीसाठी आणणारा आरोपी कलिमरफिक खामकर याला “एमडी” या अंमलीपदार्थसह अटक करण्यात आली. तसेच पुढील तपासात त्याचे सहकारी जकी अफोरोज पिट्टू व सुभाष रघुपती पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर या आरोपींकडून अडीच किलो ड्रग्ससह जवळपास 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना 5 जानेवारीपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

यावर्षी जवळपास 4 कोटींचे ड्रग्ज जप्त

नवीन वर्षांच्या पार्ट्यांसाठी या अंमली पदार्थांचा पुरवठा केला जाणार होता. तर शॉर्टकट पैसे मिळवण्यासाठी सुभाष पाटील या आरोपीने पनवेल परिसरात दोन महिन्यापूर्वी ड्रुग्स फॅक्टरी टाकली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या ठिकाणी 5 किलो ड्रुग्स बनवण्यात आले आहे. या वर्षात जवळपास 4 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सह पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, अप्पर पोलीस आयुक्त महेश घुर्ये, सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त, पोलीस उप आयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघन माळी, अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी एस सय्यद, पराग सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक इनामदार, पोलीस हवालदार मोरे, कोळी, उटगीकर, पिरजादे, कांबळे, पोलीस नाईक पाटील जेजुरकर, फुलकर, बोरसे, जोशी, मोरे, सोनवलकर किरण पाटील व पोलीस शिपाई ठाकूर यांनी ही कामगिरी केली. (Drug action on New Year’s Eve in Navi Mumbai,three accused arrested)

इतर बातम्या

Nashik Crime: फीचे पैसे हरवल्याने मानसिक तणावातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, नाशिकमधील खळबळजनक घटना

Pandharpur Crime: पंढरपूरचे ‘ते’ प्रकरण मानवतेला काळीमा फासणारे; राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.