Navi Mumbai Murder : अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

पनवेल तालुक्यातील चिंचवली गावात सदर जोडपे राहत होते. या जोडप्यामध्ये चारित्र्याच्या संशयातून सतत वाद होत असत. आपल्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. याच कारणातून पतीने पत्नीच्या डोक्यात वीट घालून तिची हत्या केली.

Navi Mumbai Murder : अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 11:47 PM

नवी मुंबई : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात वीट मारून तिची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. पनवेल तालुक्यातील चिंचवली गावात विट भट्टीवर काम करणाऱ्या पती (Husband)ने चारित्र्याच्या संशयावरून आपल्याच पत्नी (Wife)च्या डोक्यात विट मारून तिची हत्या केली. घटनेनंतर पतीने शेजारी असणाऱ्या जंगलात पळ काढला. या घटने संदर्भात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जंगलात पळून जाणाऱ्या पतीला ताब्यात घेत त्याला अटक केली. (Husband brutally murders wife on suspicion of immoral relationship)

पनवेल तालुक्यातील चिंचवली गावात सदर जोडपे राहत होते. या जोडप्यामध्ये चारित्र्याच्या संशयातून सतत वाद होत असत. आपल्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. याच कारणातून पतीने पत्नीच्या डोक्यात वीट घालून तिची हत्या केली, असे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले.

सांगलीत तरुणाची हत्या

अज्ञात कारणावरुन एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याची घटना सांगलीतील सिव्हिल रोडवर घडली आहे. रोहन नाईक असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही हत्या कुणी आणि का केली ? याचा तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत. हल्ला झाल्यानंतर दगडाने जबर मारहाण करत हल्लेखोर पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. पोलीस हल्लेखोराचा तपास करत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून तरुणावर हल्ला

नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे प्रेमसंबंधातून धारदार शस्त्राने युवकावर वार केल्याने युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्रविण रावळा जाधव असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या युवकावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून या युवकावरही विनयभंग केल्याप्रकरणी तरुणीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Husband brutally murders wife on suspicion of immoral relationship)

इतर बातम्या

Hingoli | बिस्कीट देण्याच्या बहाण्यानं चिमुरडीसोबत लज्जास्पद कृत्य! गुन्हा दाखल, पण आरोपी मोकाटच

प्रधानपदाची निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून बिल्डरांची घरे लुटणाऱ्याला अटक

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.