नवी मुंबईत अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून संबंध ठेवणाऱ्या नराधमला अटक

पीडित 17 वर्षीय मुलगी उल्वे सेक्टर 2 मधील रहिवासी असून घरकाम करते. मुलीची चार महिन्यांपूर्वी एका 30 वर्षीय तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले. त्यानंतर नराधमाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्या शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिली.

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून संबंध ठेवणाऱ्या नराधमला अटक
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 2:49 AM

नवी मुंबई : अल्पवयीन मुली (Minor Girl)ला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शारिरीक संबंध प्रस्थापित करणाऱ्या एका 30 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. शारिरीक संबंधातून मुलगी दोन ते अडीच महिन्यांची गरोदर आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस पुढील कारवाई करीत आहेत. (In Navi Mumbai an accused was arrested for assaulting a minor girl by a love trap)

पीडितेच्या आईला कळताच तिने पोलिस ठाणे गाठले

पीडित 17 वर्षीय मुलगी उल्वे सेक्टर 2 मधील रहिवासी असून घरकाम करते. मुलीची चार महिन्यांपूर्वी एका 30 वर्षीय तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले. त्यानंतर नराधमाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्या शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिली. हा संपूर्ण प्रकार मुलीच्या आईला कळताच आईने त्वरित एनआरआय पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता आरोपीने तिला काम करत असलेल्या सलूनच्या मागच्या रुममध्ये नेऊन शरीरसंबंध ठेवले. यातून ती दोन ते अडीच महिन्यांची गरोदर असल्याचे कळले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करुन त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. सध्या आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुण्यात ज्युनिअर अभिनेत्रीवर दिग्दर्शकाकडून बलात्कार

पार्टी करण्यासाठी बोलावून ज्युनिअर अभिनेत्रीवर दिग्दर्शकाने बलात्कार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सन फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दिग्दर्शकाने काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तसेच वेगवेगळ्या पार्टीमध्ये बोलवून अभिनेत्रीवर बलात्कार केला. अभिनेत्री 17 वर्षांची असल्यापासून आजपर्यंत या कास्टिंग डायरेक्टरने तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अमित प्रेमचंद सिटलानी ( 40) असे गुन्हा दाखल झालेल्या कास्टिंग डायरेक्टरचे नाव आहे. (In Navi Mumbai an accused was arrested for assaulting a minor girl by a love trap)

इतर बातम्या

पालघर जिल्ह्यातील airtel टॉवरमधून BTS व VIL कार्डाची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Solapur Murder: आधी हत्या, मग कोरड्या विहिरीत मृतदेह फेकला! अखेर मारेकऱ्यांना पोलिसांनी गाठलंच

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.