आधी विवाहबाह्य संबंधाचा दावा, आता आणखी एक गंभीर आरोप, गजानन काळेंच्या पत्नीने वात पेटवली

आधी मानसिक आणि शारीरिक छळासह, विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केल्यानंतर, आता गजानन काळेंवर पत्नी संजीवनी (Sanjeevani Kale) यांनी आणखी एक आरोप लावला आहे.

आधी विवाहबाह्य संबंधाचा दावा, आता आणखी एक गंभीर आरोप, गजानन काळेंच्या पत्नीने वात पेटवली
गजानन काळे आणि संजीवनी काळे
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 11:12 AM

नवी मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale MNS) यांच्या पत्नीने त्यांच्याविरोधात गंभीर आरोपांची माळ लावली आहे. आधी मानसिक आणि शारीरिक छळासह, विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केल्यानंतर, आता गजानन काळेंवर पत्नी संजीवनी (Sanjeevani Kale) यांनी आणखी एक आरोप लावला आहे. गजानन काळे यांनी मनपा अधिकारी आणि कंत्राटदारांना लुबाडून पैसे कमावल्याचा गंभीर आरोप संजीवनी काळे यांनी केला आहे.

या सर्व प्रकारामुळे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांचे पाय आणखी खोलात जात आहे. मनसे शहराध्यक्षपदी नेमणूक झाल्यावर अक्षरशः बायकोच्या जीवावर उदरनिर्वाह करणारा साधा पदाधिकारी, आज करोडोंचा मालक कसा झालाय, असा सवाल संजीवनी यांनी उपस्थित केला आहे.

सर्व मनपा अधिकारी कर्मचारी गजानन काळेचा खरा चेहरा लोकांसमोर आल्यामुळे का खुश आहेत, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

अधिकारी, कंत्राटदारांना धमकावून वसुली

“नवी मुंबई महापालिकेचे विभाग अधिकारी, कंत्राटदार यांना धमकावून त्यांच्याकडून लाखो रुपयांची वसुली शहराध्यक्ष गजानन काळे करत होता. प्रत्येक 2 ते 5 दिवसांनी गजानन काळेच्या घरी अनेक अधिकारी कंत्राटदार स्वतः किंवा त्यांच्या माणसांना पाठवून 2 ते 3 लाख रुपये देत होते” असा दावा संजीवनी काळे यांनी केला.

कुठलाही व्यवसाय नसताना केवळ इस्टेट एजंट असल्याचे दाखवत, आज नवी मुंबईत 4 ते 5 घरे, 2 गाड्या आणि लाखोंची रोख रक्कम गजानन काळे यांनी कमावली. हा सगळा काळा पैसा असल्याची टीका संजीवनी काळे यांनी केली.

गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल 

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच तक्रार दाखल केली आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे (Sanjivani Kale) यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात (Nerul Police Station) तक्रार दाखल केली आहे.

मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या आणि अशा आदी कलमांखाली काळे यांच्या पत्नीकडून नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या काही वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

VIDEO :  Special Report | मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

संबंधित बातम्या  

अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

Navi Mumbai | मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून मारहाण, छळवणुकीचा गुन्हा दाखल

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.