मनसेत सर्वात मोठा संघर्ष उफाळला, बड्या पदाधिकाऱ्याचा अमित ठाकरेंवर गंभीर आरोप, नवी मुंबईत राडा

मनसेच्या पदाधिकाऱ्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षावर गंभीर आरोप केलाय. राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे, असा गंभीर आरोप या पदाधिकाऱ्याने केला आहे. कामगारांची बाजू सोडत नाही म्हणून मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा या पदाधिकाऱ्याने केलाय.

मनसेत सर्वात मोठा संघर्ष उफाळला, बड्या पदाधिकाऱ्याचा अमित ठाकरेंवर गंभीर आरोप, नवी मुंबईत राडा
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 5:07 PM

नवी मुंबई | 9 जानेवारी 2024 : मनसेच्या पदाधिकाऱ्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षावर गंभीर आरोप केलाय. राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे, असा गंभीर आरोप या पदाधिकाऱ्याने केला आहे. कामगारांची बाजू सोडत नाही म्हणून मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा या पदाधिकाऱ्याने केलाय. हा पदाधिकारी मनसेच्या मराठी कामगार सेनेचा अध्यक्ष आहे. महेश जाधव असं त्यांचं नाव आहे. महेश जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अमित ठाकरे यांच्यावर मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

“मी महेश जाधव. मी आता राजगडमध्ये कामागरांची बाजू घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला. हे ठाकरे आहेत की गुंड आहेत? अमित ठाकरेंसारख्या माणसाला हे शोभत नाही. अमित ठाकरे यांनी माझ्यावर हात उचलला. त्यांना 800 हजार कामगारांचा तयतयाट लागेल”, असं महेश जाधव सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत म्हणाले आहेत.

महेश जाधव यांच्या या आरोपांनंतर नवी मुंबईत मोठा राडा झाला. नवी मुंबईत महेश जाधव समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. माथाडी कामगार महेश जाधव यांच्या समर्थनार्थ मेरी कव्हर रुग्णालयाजवळ जमा झाले. याचवेळी मनसे कार्यकर्ते रुग्णालयात येत असताना महेश जाधवांच्या समर्थकांनी मनसे कार्यकर्त्यांना पळवून-पळवून मारल्याचं समोर आलं आहे. एका सोसायटीमध्ये लपायला गेले असता त्या सोसायटीतील सेक्युरी रुमच्या काचा माथाडी कामगारांनी फोडल्या आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयातून काढता पाय घेतला.

महेश जाधव यांची मनसेतून हकालपट्टी

दरम्यान, मनसेकडून याबाबत अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन पत्रक जारी करण्यात आलं आहे. या पत्रकात मराठी कामगार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. “सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळविण्यात येत आहे की, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. मराठी कामगार सेना या संघटनेचा, त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी अथवा पक्षाची अंगीकृत संघटना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेशी कोणताही संबंध नसेल. त्यामुळे मराठी कामगार सेनेच्या कोणत्याही भूमिकांशी, मराठी कामगार सेनेच्या पदाधिकारी-सदस्यांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचा, पक्षाच्या इतर अंगीकृत संघटनांचा कोणताही संबंध नसेल याची सर्व महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी”, असं पत्रात म्हटलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.