मराठी राजभाषा दिनानिमित्त एक लाख नवी मुंबईकरांना पोस्ट कार्डद्वारे शुभेच्छा, मनसेचा संकल्प

मनसे(MNS)प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी भाषा गौरव दिवस (Marathi Language Day) मोठया उत्साहात साजरा करण्याचे आदेश महाराष्ट्रातील प्रत्येक मनसे पदाधिकारी व मनसे कार्यकर्त्यांना दिले होते.

मराठी राजभाषा दिनानिमित्त एक लाख नवी मुंबईकरांना पोस्ट कार्डद्वारे शुभेच्छा, मनसेचा संकल्प
मनसे नवी मुंबईकरांना पत्र पाठवणार
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 7:08 AM

नवी मुंबई : मनसे(MNS)प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी भाषा गौरव दिवस (Marathi Language Day) मोठया उत्साहात साजरा करण्याचे आदेश महाराष्ट्रातील प्रत्येक मनसे पदाधिकारी व मनसे कार्यकर्त्यांना दिले होते. मराठी भाषा गौरव दिवस जितका भव्य करता येईल तितका तो करण्याचे, व त्याचबरोबर त्यात लोकांचा सहभाग जास्तीत जास्त असावा या सूचना देखील राज ठाकरे यांनी दिल्याआहेत. त्याअनुषंगाने दिनांक 27 फेब्रुवारी “मराठी राजभाषा” दिनानिमित्त नवी मुंबई मनसे तर्फे नवी मुंबईकरांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात येणार आहेत. यामध्ये एक लाख पोस्ट कार्ड घरोघरी जाऊन देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. या पोस्ट कार्डचे अनावरण आज मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते राजगड, दादर कार्यालय येथे करण्यात आले. नवी मुंबई मनसेच्या या अनोख्या उपक्रमाला अमित ठाकरे यांनी पोस्टकार्डवर शुभेच्छा देत कौतुक देखील केले. सदर प्रसंगी नवी मुंबई मनसेच्या वतीने पहिले शुभेच्छा पोस्टकार्ड मनसे नेते अमित ठाकरे यांना देण्यात आले.

मी कपाळी लाविता गंध मराठी भाषेचा

नवी मुंबईकरांना समक्ष भेटून देण्यात येणाऱ्या पोस्ट कार्डवर “मी कपाळी लाविता गंध मराठी भाषेचा, अभिमान माझ्या मातीचा आसमंत जाहला” अशा आशयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पोस्टकार्ड वरील शुभेच्छा जगविख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांनी स्वतः कॅलिग्राफी केलेल्या आहेत. तसेच या शुभेच्छा सुप्रसिद्ध लेखक राहुल सिद्धार्थ साळवे यांनी शब्दबध्द केल्या असल्याची माहिती नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रसंगी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, सचिन आचरे, सहसचिव अभिजित देसाई, अमोल इंगोले, नितीन लष्कर, शरद डिगे, विधी कक्षाचे निलेश बागडे, चित्रपट सेनेचे किरण सावंत आणि अनिकेत पाटिल उपस्थित होते.

इतर बातम्या

युक्रेनमधील भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक घोषित; एका फोनवर मिळेल मदत, जाणून घ्या सर्व नंबर!

नवी मुंबईतील लॉजवर प्रियकर-प्रेयसी भेटले, आधी जोरदार भांडणं, मग निर्घृण हत्याकांड

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.