Video | सकाळी-सकाळी ED अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले, तेव्हा नेमकं काय घडलं ? ऐका…

महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी काल सकाळी कधी पोहचले, त्यांनी कशी चौकशी केली, त्यांची अटकेची पद्धत कशी होती, याबद्दल प्रथमच मलिक यांच्या मुलगी निलोफर खान यांनी माध्यमांशी संवाद साधला. जाणून घेऊयात मलिकांची अटक कशी झाली ते...

Video | सकाळी-सकाळी ED अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले, तेव्हा नेमकं काय घडलं ? ऐका...
नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खान आणि शेजारी मंत्री जितेंद्र आव्हाड.
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 1:22 PM

मुंबईः महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या ईडी अटकेवरून महाराष्ट्रातील राजकीय लढाई तीव्र झाली आहे. महाविकास आघाडीतले सारेच पक्ष भाजपवर तुटून पडतायत. तर भाजपकडून अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घालणार का, असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. याचे पुढे काय होईल, ते येणारा काळच ठरवेल. मात्र, नवाब मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी काल सकाळी कधी पोहचले, त्यांनी कशी चौकशी केली आणि त्यांची अटकेची पद्धत कशी होती, याबद्दल प्रथमच मलिक यांच्या मुलगी निलोफर खान यांनी माध्यमांशी संवाद साधला. जाणून घेऊयात मलिकांची अटक कशी झाली ते…

कधी पोहचले घरात?

सकाळी सहा वाजलेले. आम्ही यावेळेस नमाजसाठी झोपेतून लवकर उठतो. माझी आईही नमाजच्या प्रार्थनेसाठी लवकर उठवली होती. मात्र, तितक्यात दरवाजाची घंटी वाजली. त्यांनी दरवाजा उघडला. तर ईडीचे अधिकारी हजर होते. त्यांनी आपली ओळख सांगितली. आईने ही माहिती वडिलांना जाऊन दिली. ईडीचे अधिकारी आल्याचे सांगितले. आम्ही त्यांना बसायला सांगितले. मात्र, त्यांनी आमच्याकडे सर्च वॉरंट असल्याचे सांगितले. त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची विनंती केली. त्यांनी घरात शोधाशोध केली.

कधी दिला समन्स?

घरातली शोधाशोध संपल्यानंतर ईडीचे ऑफिसर म्हणाले की, आम्हाला सरांना चौकशीसाठी ईडी ऑफिसमध्ये घेऊन जावे लागेल. आमच्या वडिलांनी त्यांना थांबायला सांगितले. चहा-पाणी घेऊ. सकाळची वेळ आहे. ते तयार झाले. वडिलांनी स्वतःची कार काढली. माझा भाऊ त्यांच्यासोबत होता. ते ईडी कार्यालयात पोहचले. तिथे गेल्यानंतर वडिलांच्या हातात समन्स टेकवण्यात आले. हे तुमचे समन्स असल्याचे सांगितले. माझे वडील म्हणाले की मी सही करणार नाही. तुम्हाला ते मला अगोदरच द्यायला हवे होते. तुम्ही मात्र, मलाच माझ्याच गाडीत बसवले. जबरदस्तीने इथे आणले. हा कोणता प्रोटोकॉल पाळण्यात आला, असा सवाल यावेळी निलोफर खान यांनी केला. खान यांच्यासोबत महाविकास आघाडीचे मंत्री जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. दरम्यान, दुसरीकडे आज मंत्रालयाबाहेर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केले आहे.

इतर बातम्याः

Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!

महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!

नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.