शरद पवार यांच्या दिल्लीतील बैठकीतून मोठी बातमी, अजित पवार यांना धक्का देणारा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार यांच्या गटाला धक्का देणारे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शरद पवार यांच्या दिल्लीतील बैठकीतून मोठी बातमी, अजित पवार यांना धक्का देणारा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 5:16 PM

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावलेली. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समोर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी गटाला धक्का देणारा हा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच एस. आर. कोहली यांनादेखील निलंबित करण्यात आलं आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत याबाबत ठराव करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदास सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना याबाबत पत्र लिहिलं होतं. त्यांनी अजित पवार गटावर कारवाई करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांना केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी कारवाई केली आहे. पण त्यांच्या या कारवाईवर अजित पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

बैठकीत नेमका ठराव काय?

शरद पवार यांनी बोलावलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज तासाभरापेक्षा जास्त वेळ चालली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित करण्यात आलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते एस. आर. कोहली यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पण या बैठकीत मंत्री छगन भुजबळ किंवा अजित पवार यांचं नाव नाही.

हे सुद्धा वाचा

शरद पवार हेच आमचे मुख्य नेते आहेत. तेच आमच्या पक्षाबाबत निर्णय घेऊ शकतात, असाही एक ठराव सर्वांच्या सहमताने घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या बैठकीत 25 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यापैकी 22 महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अजित पवार यांच्या बंडाबाबत या बैठकीत सखोल चर्चा झालीय. या बैठकीत नेमकं आणखी काय-काय निर्णय घेण्यात आले. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येणार आहे.

शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीवर अजित पवार यांचा आक्षेप

दरम्यान, शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीवर अजित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. शरद पवार यांनी बोलावलेली बैठक बेकायदा आहे, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. पक्षाबाबतचा निर्णय फक्त निवडणूक आयोग घेईल. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रीय कार्यकारणी झालेल्या बैठकीचा निर्णय अवैध आणि बेकायदेशीर असल्याची भूमिका अजित पवार गटाची आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.