‘एकदातरी गृहमंत्रीपद द्या, असं कित्येकदा सांगायचो’, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

"भाषणं करुन इथल्या मुला-मुलींना रोजगाळ मिळणार नाही. अरे इतके वर्ष सर्वात जास्त गृहमंत्री कोण राहिलं आहे ते माहिती आहे? आर. आर. पाटील. मी कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो, मला एकदा गृहमंत्रालय द्या, बघतोच एकेकाला. बघतो म्हणजे चांगला कारभार करायला. वेडवाकडं चालू देणार नाही. मला वेडवाकडं खपतच नाही. माझा कार्यकर्ता चुकली तरी मी त्याला म्हणतो घे त्याला टायरमध्ये तिच्या मायला", असं अजित पवार म्हणाले.

'एकदातरी गृहमंत्रीपद द्या, असं कित्येकदा सांगायचो', अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 5:52 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सभेत एक गौप्यस्फोट केला. “मला एकदातरी गृहमंत्रीपद द्या, असं कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार तासगावमध्ये म्हणाले. “वेडवाकडं चालूच देणार नाही. कारण वेडवाकडं खपतच नाही”, असंदेखील अजित पवार म्हणाले आहेत. “आता बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालायला उतरलो. तिथून समोर तुमचं बस स्थानक बघितलं. आरारारा… अरे माझं बस स्थानक येऊन बघा काय बस स्थानक आहे आणि इथलं बघा. अरे नेतृत्वामध्ये धमक आणि ताकद असावी लागते. नुसतं भाषणं करुन तुमची पोटं भरणार नाहीत. भाषणं करुन इथल्या मुला-मुलींना रोजगाळ मिळणार नाही. अरे इतके वर्ष सर्वात जास्त गृहमंत्री कोण राहिलं आहे ते माहिती आहे? आर. आर. पाटील. मी कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो, मला एकदा गृहमंत्रालय द्या, बघतोच एकेकाला. बघतो म्हणजे चांगला कारभार करायला. वेडवाकडं चालू देणार नाही. मला वेडवाकडं खपतच नाही. माझा कार्यकर्ता चुकली तरी मी त्याला म्हणतो घे त्याला टायरमध्ये तिच्या मायला”, असं अजित पवार म्हणाले.

“आर. आर. आबा पण माझ्याबरोबर आमदार झाले. सगळ्या कंपनीचा पराभव केला. राष्ट्रवादीची स्थापना का झाली? परकीय व्यक्ती या देशाचा पंतप्रधान होता कामा नये म्हणून परकीय व्यक्ती कोण सोनिया गांधी म्हणून वेगळ्या पक्ष काढला. ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या आणि निकाल लागला, आणि काँग्रेसच्या विलासराव देशमुख सरकारला आपण पाठिंबा दिला. चार महिन्यांआधी वेगळा पक्ष काढला आणि पुन्हा त्यांच्याच दावणीला जायचं”, असं अजित पवार म्हणाले.

“आर. आर. पाटील गेल्यानंतर स्मिताच्या लग्नाला मी तिथे उभा होतो ही आमची संस्कृती आहे. पण आज इथे तासगावमध्ये काय कामे झाली? हे चक्र आहे. आम्ही खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री सगळी पदे भोगली. आता पुढे नवीन पिढी देखील तयार केली पाहिजे. पुढच्या पिढीला देखील संधी दिली पाहिजे. या मतदारसंघातल्या सूतगिरणीची काय अवस्था आहे? शेजारच्या पलूस तालुक्यातील सूतगिरणीची बघा. कारण माणूस कर्तृत्ववान असावा लागतो. तासगावची काय अवस्था आहे ते बघा. भावनिक होऊन मते देऊन प्रश्न सुटत नाहीत”, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अजित पवार आणखी काय-काय म्हणाले?

“दिवाळीच्या निमित्ताने माझ्या आपल्या सर्वांना शुभेच्छा! महाराष्ट्रातील महायुतीचा प्रत्येक उमेदवार हा आमदार म्हणून निवडून आला पाहिजे. हा मतदारसंघ आर. आर. पाटलांचा मतदारसंघ आहे. त्यानंतर सुमनताई पाटलांचा मतदारसंघ, आता उद्याच्या पाच वर्ष करता कोणाचा करायचा हा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. काही जण दबक्या आवाजात सांगतात की, उद्या आम्हाला त्रास होईल का? पण मी एक सांगतो, मी शाहू, फुलेंच्या विचारांपुढे जाणारा माणूस आहे. राज्य सरकारने अनेक समाजासाठी वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या. मुस्लिम समाजाच्या विकासासाठी देखील अल्प शिक्षण संशोधन संस्था स्थापन केली आहे. आता याचा विचार अल्पसंख्याक समाजाने केला पाहिजे”, असं मत अजित पवारांनी मांडलं.

“आम्ही सर्व धर्म समभाव, शिव-शाहू-फुले आंबेडकर यांच्या विचारांचे आहोत. त्यामुळे तुम्ही का घाबरता? हे सगळे निगेटिव्ह सेट करत आहेत आणि तुम्हाला कुठेतरी अडचणी येतील, असं सांगितलं जातं. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम आवडलं. ते 24 तास काम करतात. भारताचा कसा विकास होईल? याच्यासाठी काम करतात. 2014 चा निकाल आठवा, निकाल लागल्यावर राष्ट्रवादीने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला, पाहिले का नाही? आम्ही ते टीव्हीवर पाहिले”, असं अजित पवार म्हणाले.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....