अजूनही वेळ गेली नाही, केंद्र सरकारने वेळीच कायदे मागे घ्यावेत : नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे (NCP leaders on supreme court suspends implementation of three farm laws).

अजूनही वेळ गेली नाही, केंद्र सरकारने वेळीच कायदे मागे घ्यावेत : नवाब मलिक
नवाब मलिक
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 4:41 PM

मुंबई : सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिल्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. “अजून वेळ गेली नाही. केंद्र सरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा”, असं नवाब मलिक म्हणाले (NCP leaders on supreme court suspends implementation of three farm laws).

“सर्वोच्च न्यायालयाने तीनही कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्यादृष्टीने हे पहिले पाऊल आहे”, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली. त्याचबरोबर “केंद्र सरकारने आडमुठेपणाचे धोरण सोडले पाहिजे. तिन्ही कायदे मागे घेऊन नव्याने कायदा करण्यासाठी प्रस्ताव तयार केला पाहिजे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे”, असेही नवाब मलिक म्हणाले.

देशातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. देशातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली (NCP leaders on supreme court suspends implementation of three farm laws).

“अनेक दिवस ऊन, वारा, थंडी, पावसाची कसलीही तमा न बाळगता केंद्र सरकारच्या दारात शेतकरी आंदोलनासाठी बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांना दाद दिली नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेतकऱ्यांवर अशी वेळ कधीही आली नव्हती”, असेही जयंत पाटील म्हणाले.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

“जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत दिल्लीत आंदोलनासाठी बसलेला शेतकरी मागे हटणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्यादृष्टीने जो कायदा स्थगिती योग्य आहे. तो कायदा रद्द करण्याची भूमिका केंद्र सरकारने लवकरात लवकर घ्यावी”, असंही जयंत पाटील म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी अहंभाव सोडण्याची वेळ आली असून ते लवकरच तो सोडतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न केल्याने शेतकरी रस्त्यावर : महेश तपासे

कृषी कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मांडली. “देशातील शेतकरी कृषी कायद्याविरोधात तीन महिन्यापासून आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शेतकर्‍यांच्यासोबत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कृषी कायदा बनवताना शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करायला हवा होता. पण तो केला नाही त्यामुळेच देशातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे”, अशी प्रतिक्रिया महेश तपासे यांनी दिली.

संबंधित बातमी : 

 Supreme Court stays Farm laws | जय किसान! मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का, कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती | Supreme Court of India stay Agricutlure Bill (tv9marathi.com)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.