Sharad Pawar On St Strike: एस.टी. कामगारांना चुकीचं नेतृत्व लाभलं, पवारांची सहानुभूती, चौकशीची मागणी
शरद पवार यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांचं त्यांनी मुद्देसूद खंडन केलं तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरही मत व्यक्त केलं.
मुंबई : एसटी कामगारांच्या आंदोलनाला चुकीचं नेतृत्व लाभलं. त्यामुळेच आंदोलक भरकटले आणि त्यांनी हा हल्ला झाला, अशी प्रतिक्रिया शरद पवार (Sharad Pawar) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली. 8 एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employee) शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या घरावर चप्पल आणि दगडफेक केली. मात्र त्यांना दोष न लावता सहानुभूती दाखवत आंदोलनाच्या नेतृत्वावर शरद पवारांनी बोट ठेवलं. तसंच आंदोलकांना चिथावून देण्याचा आरोप असलेल्या गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadawarte) यांचं नाव न घेता, त्यांच्या चौकशीची मागणी केली. शरद पवार यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांचं त्यांनी मुद्देसूद खंडन केलं तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरही मत व्यक्त केलं.
‘द्वेष पेरणाऱ्यांमुळे हे घडलं’
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविषयी प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले ,’ आदल्या दिवशी कोर्टाचा निकाल लागला. तो आमच्या बाजूनी लागल्याचा सांगितलं गेलं. कौतुक व्यक्त केलं गेलं. गुलाल उधळला गेला. जिंकलो म्हणून सांगितलं. याचा अर्थ एकच आहे. याचा अर्थ एकच आहे, जे चमत्कारीक नेतृत्व आहे, त्यांनी कुणाच्याविरोधात किंवा एका व्यक्तीच्या विरोधात जो द्वेष पेरला, त्याचा हा परिणाम आहे. मात्र यासाठी दोषी असलेल्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही शरद पवार यांनी केली.
8 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या घरावर हल्ला
गेल्या अनेक महिन्यांपासून आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी 8 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर अचानक हल्लाबोल केलं होतं. शेकडो आंदोलन पवार यांच्या घरावर चप्पला आणि दगडांचा मारा करू लागले. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही, मात्र आंदोलक अशा प्रकारे एकदम हिंसक का झाले, याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच एवढा मोठा जमाव पवार यांच्या घराकडे येतोय, याची माहिती पोलिसांनाही कशी मिळाली नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, आंदोलकांना चिथावणी देण्यास आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्षे हे दोषी असल्याचा आरोप केला जात आहे. घटनेच्या आदल्या दिवशी त्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणाचाचाच हा परिणाम असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सदावर्ते हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांची चौकशी सुरु आहे.
इतर बातम्या-