ND Patil Passed Away | एन. डी. पाटील यांच्या निधनाने शेतकरी, कष्टकऱ्यांबद्दल आस्था असलेला तत्त्वनिष्ठ नेता हरपला; पवारांसह मान्यवरांची श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. पवार म्हणाले, डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे.

ND Patil Passed Away | एन. डी. पाटील यांच्या निधनाने शेतकरी, कष्टकऱ्यांबद्दल आस्था असलेला तत्त्वनिष्ठ नेता हरपला; पवारांसह मान्यवरांची श्रद्धांजली
N. D. Patil
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 1:35 PM

मुंबईः शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचं निधनं झालं आहे. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कष्टकरी वर्गाप्रती आस्था…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. पवार म्हणाले, डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले, असा उल्लेखही त्यांनी केला.

अजातशत्रू नेतृत्व

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, जेष्ठ्य नेते प्रा. एन. डी पाटील सरांचं निधन झालं, ही बातमी आताच कळाली. सरांचं आपल्यातून निघून जाणे, ही महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी आहे. आपल्या तत्वाशी कोणतीही तडजोड न करणार अजातशत्रू नेतृत्व म्हणून एन. डी. पाटील सरांची ओळख होती. भावपूर्ण श्रद्धांजली..!!

विरुद्ध विचारांचे असलो तरी…

भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोल्हापूरच्या चळवळीच्या इतिहासातले एन. डी. पाटील हे मोठे नाव होते. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. माझ्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. आम्ही विरुद्ध विचारांचे आम्ही असलो तरी खर ते खरं, खोटं ते खोटं असं त्यांचा म्हणणं होतं. टोलची खोकी जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार असे ते म्हणाले होते. टोलच्या प्रश्नात आम्ही एकत्र आलो होतो. पक्ष, विचार जरी वेगळे असले तरी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी ते संघर्ष करत राहिले. पानसरे यांच्या जाण्याने त्यांना खूप दुःख झाले होते. त्यांना न्याय मिळावा यासाठी ते झटत राहिले, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

येणारी पिढी शिकेल…

भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने खूप जेष्ठ आणि अनुभवी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. चळवळीच्या संस्कारांचे ते भक्कम स्तंभ राहतील. त्यांच्याकडून येणारी पिढी भविष्यात ही शिकत राहील !!

इतर बातम्याः

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!

Nashik Jobs : घरबसल्या नोकरी मिळवा; नाशिकमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावा, कसे व्हाल सहभागी?

Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात 16 कोविड सेंटर सुरू; कुठे मिळतायत उपचार?

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.