वाघांचा अधिवास असलेल्या चंद्रपुरात नवे अभयारण्य, वन्यजीव मंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील कन्हारगाव येथे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. (New Sanctuary In Chandrapur For Tiger)

वाघांचा अधिवास असलेल्या चंद्रपुरात नवे अभयारण्य, वन्यजीव मंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 1:36 PM

चंद्रपूर : वाघांचे भ्रमणमार्ग भक्कम करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील कन्हारगाव येथे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 269 चौरस किमी क्षेत्राला जंगल क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे. (New Sanctuary In Chandrapur For Tiger)

वाघांचा उत्तम अधिवास असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आता नव्या अभयारण्याची घोषणा करण्यात आली आहे. वाघांचे भ्रमणमार्ग भक्कम करण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील कन्हारगाव येथे अभयारण्य घोषित झाल्याने 2013 पासून पर्यावरणवाद्यांनी रेटलेली मागणी पूर्ण झाली आहे.

राज्य सरकारने या भागातील 269 चौ. किमी जंगल क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा दिला आहे. हे राज्यातील 50 वे अभयारण्य असणार आहे. हे संपूर्ण क्षेत्र आजवर वनविकास महामंडळाच्या अधीन होते. महामंडळ या क्षेत्रात व्यावसायिक वृक्ष लागवड, तोड आणि विक्री करून नफा मिळवत होते. मात्र आता कन्हारगाव अभयारण्य घोषित झाल्याने छत्तीसगडच्या इंद्रावती- तेलंगणाच्या कावल आणि यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात जाणारा वाघांचा भ्रमणमार्ग सुरक्षित झाला आहे.

चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पूर्ण वाढ झालेले वाघ आपले नवे क्षेत्र शोधत असतात. विरळ अथवा खेड्यांच्या जवळ वाघांनी वास्तव्य केल्याने अनेकदा मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवतो. हे प्रकार टाळण्यासाठी वाघांना एका घनदाट जंगलातून अन्य जंगलात जाण्यासाठी नैसर्गिक भ्रमणमार्ग हवे असतात.

कन्हाळगाव येथील अभयारण्य घोषित झाल्याने छत्तीसगडच्या इंद्रावती- तेलंगणाच्या कावल आणि यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात जाणारा वाघांचा भ्रमणमार्ग सुरक्षित झाला आहे. अभयारण्य घोषित झाल्याने वृक्षतोड बंद होण्यास मदत होणार आहे. वन्यजीव संरक्षण-संवर्धन यासाठीचा आराखडा मोठ्या निधीसह राबवता येणार आहे. कन्हारगाव जंगलात उत्तम वन्यजीव वैविध्य असल्याने भविष्यात पर्यटनाला चालना-रोजगार वाढीची शक्यता वर्तवली जात आहे.(New Sanctuary In Chandrapur For Tiger)

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उर्मिला मातोंडकरांचा प्रतिसाद, रक्तदानाला हजेरी

अनेक देशांत मंजूरी मिळालेल्या Pfizer च्या कोरोनावरील लसीची काय आहे किंमत आणि वैशिष्ट्ये?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.