AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाणांच्या कारस्थानांमुळे काँग्रेस सोडली, तर मिलींद नार्वेकर तिकीटं विकणारे एजंट-निलेश राणे

माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत आणि मिलींद नार्वेकरांचा समाचार घेतला आहे. विनायक राउत यांचा इतिहास कच्चा आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. राज्यात सध्या मोठा पॉलिटिकल राडा सुरू आहे.

अशोक चव्हाणांच्या कारस्थानांमुळे काँग्रेस सोडली, तर मिलींद नार्वेकर तिकीटं विकणारे एजंट-निलेश राणे
निलेश राणे
| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 8:30 PM
Share

मुंबई : संजय राऊतांच्या (Sanjay Raut) मंगळवारच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात पुन्हा राणे (Narayan Rane vs Shivsena) विरुद्ध शिवसेना सामना रंगला आहे. जुन्हा संघर्ष पुन्हा ताजा झाला आहे. नारायण राणेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय राऊतांची कुंडली मांडली. तर लगेच शिवसेनेकडून पत्रकार परिषदेत घेत विनायक राऊतांनी राणेंचा इतिहास आणि लायकी काढली. त्यात मिलींद नार्वेकरांचे (Milind Narvekar) ट्विटही आले. मिलींद नार्वेकरांच्या ट्विटला लगेच नारायण राणेंनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले. आता माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत आणि मिलींद नार्वेकरांचा समाचार घेतला आहे. विनायक राउत यांचा इतिहास कच्चा आहे.आमच्या विरोधात अशोक चव्हाण चुकीची फिडींग दिल्लीत लावत होते, म्हणून कंटाळून आम्ही काँग्रेस सोडली. अशोक चव्हाण तेव्हा तसे वागले नसते. तर तो निर्णय घेतला नसता, असे निलेश राणे म्हणाले आहेत. तर त्यांनी मिलींद नार्वेकरांना तिकीटं विकणार एजंट आहे म्हणत खिल्ली उडवली आहे.

आम्ही आमचं वजन दाखवून दिलं

आमच्यावर कोणती कारवाई होती विनायक राउत यांनी सांगावं, नाहीतर राजकारण सोडावं. ते पुराव्याच्या आधारावर कधी बोलत नाहीत. शिवसेनेत तिकिट वाचवण्यासाठी ते आहेत, अशी टीका राणेंनी केली आहे. नेते पद नव्हत तरी त्यांना राणे साहेबांनी बाळासाहेबांना मुख्यमंत्री केलं ना. विनायक राऊतांना साधे मंत्रीही नाही केलं. राणे साहेबांच काय वजन आहे शिवसेनेत ते 2005 साली आणि त्या आधीच दाखवलं आहे. विनायक राउत यांनी स्वतच वजन बघावं, असा टोला त्यांनी लगावला आहे. नारायण राणेंची नेता व्हायची लायकी नव्हती म्हणून बाळासाहेबांनी त्यांना नेतेपद दिलं नाही. संजय राऊतांना बाळासाहेबांनी नेते बनवलं होतं. अशी टीका काही वेळापूर्वीच विनायक राऊत यांनी केली होती. त्यालाचा निलेश राणे यांनी जोरादार प्रत्युत्तर दिले आहे.

नार्वेकर तिकीट विकणारे एजंट

तसेच मिलींद नार्वेकर यांच्यावरही निलेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. मिलिंद नार्वेकर यांना बसायला जागा नसायची.ते मागे उभे असायचे. शिवसेनेत तिकिट विकणारा जर कोण एजंट असेल तर तो मिलिंद नार्वेकर, अशा शब्दात त्यांनी नार्वेकरांचा समाचार घेतला आहे.तसेच नारायण राणे यांनी मिलींद नार्वेकरांना फोन केल्याच्या ट्विटला उत्तर देताना, साहेबांनी फोन केलाही असेल तर काय अडचण आहे का? उद्धव ठाकरे हे काय़ पाकिस्तानचे आहेत का? फोन करण्यात काय चुकलं? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच मेन कलाकार बघून घेतील, हे साईड अॅक्टरचे काम नाही, असा टोलाही त्यांनी नार्वेकरांना लगावला आहे.

Video: आता शिवसेनेची भाजपवर कुरघोडी, सोमय्या-मोदी-राणेंविरोधात ‘लाव रे तो व्हिडीओ’! शिवसेनेनं दाखवलेले 4 व्हिडीओ तुम्हीही पाहा

नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकरांमध्ये ट्विटरवॉर; राणे म्हणतात मला बोलायला लावू नका!

बॉय का? मिलिंद नार्वेकरांनी उत्तर देताना थेट नारायण राणेंच्या मेमरीची घंटी वाजवली !

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.