आता पोलिसांच्या विरुद्ध केस दाखल करणार? पोलिस कोठडी सुनावल्यानंतर राणेंच्या वकिलांनी काय म्हटलं?
पोलिसांनी नितेश राणेंना बेकायदेशीररित्या अडवल्याचा आरोप राणेंच्या वकिलांकडून करण्यात आलाय. त्यामुळे आता पोलिसांविरोधत तक्रार दाखल करणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
सिंधुदुर्ग : गेल्या कित्येक दिवसांपासून धडपड करूनही शेवटी नितेश राणेंना (Nitesh Rane) जामीन मिळाला नाहीच. राणेंना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी (Nitesh Rane In custody) सुनावली आहे. संतोष परब हल्ला (Santosh Parab Case) प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांच्यावर आहे. तर महाविकास आघाडी बेकायदेशीररित्या मला अडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नितेश राणे यांच्याकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी नितेश राणेंना बेकायदेशीररित्या अडवल्याचा आरोप राणेंच्या वकिलांकडून करण्यात आलाय. त्यामुळे आता पोलिसांविरोधत तक्रार दाखल करणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. न्यायालयानं आमच्या सरेंडरचं अप्लीकेशन मान्य केलं. त्यानंतर आम्हाला न्यायालयीन कस्टडीत घेतलं.आम्ही सर्वांनी मिळून युक्तिवाद केला. पोलिसांनी 10 दिवसांची कोठडी मागितली होती. पण युक्तीवादात सांगितलं की पाच दिवस नितेश राणेंनी चौकशीला सहकार्य केलं, त्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. अशी माहिती राणेंच्या वकिलांनी दिली आहे.
पोलिसांनी अयोग्य पद्धतीने रस्ता अडवला
नितेश राणे बाहेर आले तेव्हा पोलिसांनी अयोग्य प्रकारे रस्ता अडवला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेला. अशावेळी आपण आणखी फार काळ बाहेर राहिलो, तर आणखी विचित्र गोष्टी घडू शकतात, असाही प्रश्न निर्माण केला गेलो होता. नितेश राणे कुठेच गायब झाले नव्हते, त्यांनी न्यायालयात तेव्हा हजर राहण्याची काहीच गरज नव्हती, सत्र न्यायालयासमोर जे झालं, त्यातून आम्हाला राणे आणि त्यांच्या समर्थकांना खोडसाळपणे अडकवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप राणेंच्या वकिलांनी केला आहे.
तसेच सर्व आरोपींना एकत्र बसून चौकशी करण्याची पोलिसांची मागणी आहे. न्यायालयीन आरोपी आणि पोलिस कोठडीतल्या आरोपींची एकत्र चौकशी पोलिसांना करायची होती. पण तसं करता येत नाही, पोलिस चौकशीला सामोरं जाऊ, दोन दिवसांनी जामीनासाठी अर्ज देऊ, आम्ही पोलिस कोठडी कमी द्या, जास्त द्या, यावर आम्ही काहीही म्हटलेलं नाही, असेही ते म्हणाले आहेत. सरकारी वकीलांना अनेक मुद्दे मांडले होते, नितेश राणे न्यायालयात हजर झाले, ते का तर पोलिस आणि सरकारचं काम करण्याची पद्धत पाहिली, तर नितेश राणे, त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते यांना खोडासळपणे अडकवण्याचा प्रयत्न दिसतोय, असे त्यांच्या निदर्शनास आले, असेही ते म्हणाले आहेत.