मंत्र्यांना बायको आणि चहापेक्षा किटली गरम असणारा ‘पीए’च अडचणीत आणतो, nitin gadkari यांच्या चिमट्यांनी खसखस
मंत्र्यांना बायको अडचणीत आणते. नाही तर चहापेक्षा किटली गरम असलेला पीए अडचणीत आणतो, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगताच एकच खसखस पिकली. निमित्त होतं सांगली येथील पीएनजी सराफ पेढीच्या 190व्या वर्धापन दिनाचं.
सांगली: मंत्र्यांना बायको अडचणीत आणते. नाही तर चहापेक्षा किटली गरम असलेला पीए अडचणीत आणतो, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी सांगताच एकच खसखस पिकली. निमित्त होतं सांगली (sangli) येथील पीएनजी सराफ पेढीच्या 190व्या वर्धापन दिनाचं. यावेळी गडकरींची मुलाख घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाष्य करत काही किस्से सांगितले. बायकोच्या घरची भिंत बायकोला जेव्हा न सांगता कशी तोडली याचा किस्साही त्यांनी सांगितलं. तसेच लग्नाचा वाढदिवशी गाडगीळमधून (gadgil) खरेदी केल्याचंही त्यांना आवर्जुन स्पष्ट केलं. तसेच मी फुकट नाटक कधी बघत नाही. नाट्य निर्माते कर्ज काढून नाटक बसवतात. त्यामुळे मी कधीच फुकट नाटक बघत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मी पण पर्यावरणवादी आहे. आम्ही पर्यावरणच्या विरोधात नाही. मी इंजिनिअर पण नाही आणि आर्किटेक्ट पण नाही. मी सिनेमा समोरुन आणि नाटक मागून पाहतो. मी कुणाला ही कधी हार घालत नाही. अटलबिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर यांनाच फक्त माझ्या पैशातून हार घातला. जे मत देतील त्याचेही काम करतो आणि जे मतदान करत नाहीत त्यांचेही काम करतो. कारण मंत्री हा सर्वांचा असतो, असं नितीन गडकरी म्हणाले.
मुंबईसारखे फूड कुठेही नाही
पहिल्यासारखे माझे फिरणे होत नाही. सध्या माझी अडचण z प्लस मुळे होतेय. भेटणाऱ्यांची संख्या वाढल्याने वाचन कमी होतंय. माझे वजन 93 किलो आहे. आता आधी 135 किलो होते, माझे खाणे-पिणे आवड जपतो. मी सांगलीचा भडंग आवडीने खातो, असंही त्यांनी सांगितलं. कोविड काळात किचनमध्ये जाऊन अनेक पदार्थ बनवायला शिकलोय. मुंबईसारखे फूड कुठेही नाही, सध्या माझ्याकडे चार शेफ आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
पवारांसोबत फक्त शेतीवर चर्चा
सामाजिक काम करणे हा देखील राजकारणाचा भाग आहे. शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीत 90 टक्के चर्चा या शेती आणि विकास, प्रगतीवर होते. मी आणि नरेंद मोदी एका विचाराचे आहोत. माझी दोन्ही मुले राजकारणत नाहीत, असंही ते म्हणाले.
Addressing the gathering of PNG Saraf Pedhi on the occasion Of 190th Anniversary Celebration, Sangli https://t.co/ieRRqCbyTx
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 26, 2022
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : 2024 ची आमची तयारी सुरु, स्वबळावर सरकार आणणार : देवेंद्र फडणवीस