MSRTC Strike: 22 एप्रिलपर्यंत कामावर न आल्यास एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार; अनिल परब यांचा इशारा
MSRTC Strike: एसटी कामगारांना येत्या 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहे. जे कामगार कोर्टाने दिलेल्या मुदतीत कामावर आले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा तुम्हाला मार्ग मोकळा आहे, असं कोर्टाने आम्हाला सांगितलं आहे.
मुंबई: एसटी कामगारांना (msrtc) येत्या 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहे. जे कामगार कोर्टाने (court) दिलेल्या मुदतीत कामावर आले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा तुम्हाला मार्ग मोकळा आहे, असं कोर्टाने आम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कामगार आले नाही तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. कामगार आले नाही तर त्यांना नोकरीची गरज नाही, असं आम्ही समजू. कामगारांना निलंबित करणं, बडतर्फ करणं आणि नंतर त्यांची सेवा समाप्त करणं ही कारवाई आतापर्यंत केली आहे. तशीच कारवाई यानंतर केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी दिला. कामगारांनी कुणाच्याही नादाला लागू नये. चुकीची माहिती देणाऱ्यांच्या मागे जाऊन स्वत:चे नुकसान करू नये, असं सांगतानाच कामगारांनी कामावर परत यावे, असं आवाहन त्यांनी केलं.
कोर्टाच्या सुनावणीनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. त्रिसदस्यी समितीने कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी अमान्य केली. या विषयावर कोर्टात दोन दिवसांपासून सुनावणी सुरू होती. समितीचा अहवाल सादर केला गेला. कोर्टातील आमचं पिटीशन मागे घेण्याची विनंती केली. काल कोर्टाने सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. काल सांगितलं 15 एप्रिलपर्यंत कामावर या. जे कर्मचारी ज्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती त्यावर सरकारचं म्हणणं विचारलं होतं. यापूर्वी जनतेला वेठीस धरून कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नका. तुमच्या मागण्या मागा, जनतेला वेठीला धरू नका. महामंडळाचे नुकसान करू नका, सर्व कारवाया मागे घेऊ किमान सातवेळा सांगितलं. त्यानंतर काही कामगार आले काही आले नाही, असं परब म्हणाले.
नोकरी शाबूत राहणार
कोर्टाने विचारलं तुम्ही नोकरी जाईल असं काही करू नका. नोकरी शाबूत राहिली पाहिजे. त्यावर आम्ही आमचं म्हणणं मांडलं. कामगारांची नोकरी जावू नये अशीच आमची भूमिका. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आणि सात वेळा कामावर येण्याचं आवाहनही केलं. यावेळीही कारवाई करणार नाही अशी आम्ही कोर्टाला हमी दिली. त्यावर कोर्टाने 22 तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी नोकरीला यावं असे निर्देश दिले, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
एसटी पूर्ववत सुरू करा
कोर्टाने ग्रॅच्युटी, पीएफ आणि इतर फंडाबाबत सुतोवाच केलं होतं. ही देणी आम्ही कामगारांना वेळोवेळी देतच आहोत. कोविड काळात परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे थोडं मागे पुढे झालं. पण देणी नाकारली नव्हती. पीएफ आणि ग्रॅच्युटी सतत देत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांचा पाच महिने संप होता. कर्मचाऱ्यांचं मोठं नुकसान. एसटीचंही प्रचंड नुकसान. त्यामुळे कामगारांनी कामावर रुजू व्हावं. एसटी पूर्ववत सुरू करा, असं आवाहन त्यांनी केलं.
संबंधित बातम्या: