Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठ्यांची हजामत करु नका, आपापसात भादरु द्या, भुजबळ आक्रमक

Chagan Bhujbal obc Reservation | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी अहमदनगरमधील एल्गार सभा घेतली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही सोडले नाही. तसेच बहिष्काराच्या त्या निर्णयावर भाष्य केले.

मराठ्यांची हजामत करु नका, आपापसात भादरु द्या, भुजबळ आक्रमक
chagan bhujbalImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 12:24 PM

कुणाल जायकर, अहमदनगर, दि.4 फेब्रुवारी 2024 | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ओबीसी एल्गार मेळाव्यात चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सोडले नाही. भुजबळ म्हणाले होते की, मुख्यमंत्र्यांनी सांगितले माझी शपथ पूर्ण झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंय. मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर मग सर्व्हेक्षण कशासाठी करत आहात? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यानंतर मराठा समाजातील लोकांची दाढी करु नका, असे भुजबळ यांनी म्हटले.

काय म्हटले भुजबळ यांनी

एल्गार सभेत बोलताना भुजबळ म्हणाले की, न्हावी समाजातील एका व्यक्तीने ओबीसी आरक्षणासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्यामुळे मराठा समाज संतप्त झाला. त्यांनी त्या व्यक्तीच्या दुकानात न जाण्याचा निर्णय घेतला. मराठा समाज जर असे तुम्हाला बायपास करत असतील तर सर्व न्हाव्यांनी एकही मराठ्याची हजामत करु नका. त्यांना आपआपसात भादरु द्या. सागेसोयरेबाबत खोटे दाखले दिले जात आहे. प्रमाणपत्रावर खाडाखोड करण्याचे प्रकार होत आहे.

पुन्हा उपोषण कशाला?

तुमची लायकी काय हे विचारत आहेत. मात्र आजपर्यंत अनेक रत्ने ओबीसींनी दिली आहेत. त्यांनी 27 तारखेला गुलाल उधळला आहे. मग आता पुन्हा उपोषण कशाला? अद्यादेश आणि मसुदा यातील फरक यांना माहीत नाही. मराठा समाजास आरक्षण दिल्याचे सांगितले मग आता ओबीसी आयोगाकडून सर्वेक्षण कशासाठी करता आहात. मराठा समाज्याला आरक्षण मिळाला पाहिजे आमचा विरोध नाही, मात्र आमच्या ताटातले घेऊ नका , असे भुजबळ यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

सर्वांना एकत्र राहावे लागेल

दाव पर सबकुछ लगा है…असे म्हणत भुजबळ यांनी सर्वांना आता एकत्र यावे लागणार असल्याचे म्हटले आहे. सध्या काही ओबीसी नेते देखील घाबरत आहे. मात्र आमच्या सोबत 70 टक्के समाज आहे, असे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा

मग आम्ही दाढी घरीच करु, त्यांना गोर गरीबांना उपाशी मारायचंय… मनोज जरांगे यांचा भुजबळांवर पलटवार

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.