Omicron Alert: मुंबईत न्यू इयर, थर्टी फर्स्टचा प्लॅन करताय? आधी निर्बंधांची यादी वाचा!
मुंबईः ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त राज्यात उत्साहाचे वातावरण असले तरीही ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच ठिकाणी काही प्रमाणात निर्बंध लावण्यात येत आहेत. मुंबईतही ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबईतील चौपाट्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी महापालिकेने नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार पुढील काही दिवस तरी मुंबईकरांना महापालिकेचे निर्बंध आणि नियमांनुसारच वागावे लागेल. मुंबईसाठी […]
मुंबईः ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त राज्यात उत्साहाचे वातावरण असले तरीही ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच ठिकाणी काही प्रमाणात निर्बंध लावण्यात येत आहेत. मुंबईतही ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबईतील चौपाट्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी महापालिकेने नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार पुढील काही दिवस तरी मुंबईकरांना महापालिकेचे निर्बंध आणि नियमांनुसारच वागावे लागेल.
मुंबईसाठी काय आहे नियमावली?
– 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्री जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीच पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. – नवीन वर्ष असो की थर्टी फर्स्टची पार्टी किंवा लग्न समारंभ या सर्वच ठिकाणी कुठेही आतिषबाजी करता येणार नाही. फटाकेदेखील फोडता येणार नाहीत. – लग्न समारंभांवरही आता निर्बंध घालण्यात आले आहेत. यापूर्वी समारंभाला 200 जणांची परवानगी देण्यात येत होती. आता मात्र अशा कार्यक्रमांना फक्त 100 जणांची परवानगी दिली जाईल. – मुंबईतील रेस्टॉरंटदेखील 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत.
मुंबईमुळे राज्याचाही रुग्णांचा आकडा वाढता
दरम्यान, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या हळू हळू वाढत आहे. त्यात मुंबईतील रुग्णांचा आकडा विशेष भर घालणारा आहे, अशी आकडेवारी काल समोर आली. त्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या आणखी वाढू नये, याकरिता महापालिका प्रशासन कठोर पावले उचलत आहे. गुरुवारी 23 डिसेंबर रोजी राज्यात ओमिक्रॉनची उच्चांकी नोंद झाली. या दिवशी 23 नवे ओमिक्रॉन रुग्ण आढळून आले. मुंबईत 5, उस्मनाबादेत 2 आणि ठाणे, मीरा-भाइंदर, नागपूरात प्रत्येक एक रुग्ण आढळून आला. त्यामुळे राज्यातील आकडेवारीच्या तुलनेत मुंबईतील आकडे जास्त चिंताजनक आहेत.
आज राज्य सरकारच्या नियमावलीकडे लक्ष
महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा फैलाव वाढत असल्याने राज्य सरकारही अलर्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची यासंबंधी बैठक झाली असून आज राज्य सरकार नवी नियमावली जारी करणार आहे. राज्यभरातील शाळा, महाविद्यालयं सुरु होऊन अजून एक आठवडादेखील उलटलेला नाही. त्यातच नव्या वर्षाचा उत्साह लोकांमध्ये आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कोणते निर्बंध लादणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या