Section 144 in Mumbai | नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवे निर्बंध; वाचा नियमावली

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवे निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. 31 डिसेंबरला पार्टीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नवी नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यान लागू असणार आहेत.

Section 144 in Mumbai | नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवे निर्बंध; वाचा नियमावली
कोरोना विषाणू
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 10:29 AM

मुंबई : कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या ओमिक्रॉनमुळे (Omicron) संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातही ओमिक्रॉन विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. अशावेळी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या (New Year) पार्श्वभूमीवर मुंबईत नवे निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. 31 डिसेंबरला पार्टीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नवी नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यान लागू असणार आहेत.

काय आहे मुंबई पोलिसांची नियमावली?

>> आयोजित कार्यक्रमातील, सेवेशी निगडीत असणारे आयोजक, सहभागी, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक या सर्वांचेच पूर्णपणे लसीकरण झालेले असणे अनिवार्य आहे.

>> कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, कार्यक्रम, मेळावे याठिकाणी आलेल्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झालेले हवे. अभ्यागत, ग्राहक यांचेही लसीकरण झाले पाहिजे.

>> मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण झाले असावे. पूर्ण लसीकरण न झालेल्या व्यक्तींना प्रवास करण्यावर बंदी असणार आहे.

>> महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण अथवा ७२ तासांपूर्वी करण्यात आलेली आरटी पीसीआर चाचणीच वैध असणार आहे.

>> कोणत्याही कार्यक्रम, स्पर्धा, मेळावे, समारंभ याठिकाणी क्षमतेच्या 50 टक्केच लोक उपस्थित राहू शकतात. जर एकूण उपस्थित लोकांची संख्या १ हजारापेक्षा जास्त असल्यास स्थानिक प्राधिकरणाला याबाबत माहिती द्यावी लागणार आहे.

>> बंदीस्त सभागृह, बंदिस्त रेस्टॉरंट, हॉलमध्ये 50% क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.

>> मोकळ्या जागी 25% क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.

>> 31 डिसेंबर आणि ख्रिसमस निमीत्त होणा-या पार्ट्यांवर नजर ठेवण्याकरता प्रत्येक वॉर्ड मध्ये महापालिकेची 4 पथकं तैनात असतील.

>> नियम मोडणाऱ्या पार्ट्या आढळल्यास संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेलमालक यांच्यावरही नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

महाराष्ट्रात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 32 वर

महाराष्ट्रात ओमिक्रॉन विषाणूचा फैलाव वाढताना पाहायला मिळतोय. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात ओमिक्रॉन विषाणूचे नवे 4 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात 2, बुलडाणा जिल्ह्यात 1 तर मुंबईतील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत 32 लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्यातील 25 रुग्ण आता पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

इतर बातम्या :

Breaking : इम्पिरिकल डेटा गोळा झाल्यावरच निवडणूक घ्याव्यात, राज्य मंत्रिमंडळात प्रस्ताव, पुढे काय होणार?

अखेर रुपाली पाटील यांचं ठरलं, हाती ‘घड्याळ” बांधणार; मुंबईत पक्षप्रवेश

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.