onion and tomato | कांदा शेतकऱ्यांना तर टोमॅटो ग्राहकांना रडवणार

onion and tomato price | विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. या फायनल मॅचसाठी जय्यत तयारी सुरु आहे. हा सामना पाहण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आणि उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

onion and tomato | कांदा शेतकऱ्यांना तर टोमॅटो ग्राहकांना रडवणार
tomato and onionImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 11:57 AM

उमेश पारीक, लासलगाव, नाशिक | 17 नोव्हेंबर 2023 : कधी ग्राहकांना तर कधी शेतकऱ्यांना रडवणारे पीक म्हणजे कांदा आणि टोमॅटो. आता कांदा आणि टोमॅटो पुन्हा रडवणार आहे. कांदा पिकामुळे शेतकरी बेजार झाला आहे. चांगले उत्पन्न आल्यानंतर सरकारचे धोरण आणि व्यापाऱ्यांची एकाधिकारशाहीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याचवेळी टोमॅटोमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे. टोमॅटोचे भाव पुन्हा गगनाला भिडले आहेत. मुंबईतील वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोला ४५ रुपये किलो दर मिळत आहे. यामुळे किरकोळ बाजारात 65 ते 75 रुपये प्रतिकिलोपर्यंत टोमॅटो पोहोचला आहे. कांदा आणि टोमॅटो पिकाने पुन्हा एकदा वांदा केला आहे.

लासलगावमध्ये पुन्हा लिलाव बंद

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे ओळख आहे. परंतु या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. लासलगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज कांदा बाजार आवारात गेल्या ऑगस्ट महिन्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे कांदा लिलाव बंद ठेवला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पर्याय शोधावे लागत आहे.

लासलगावमुळे विंचूर बाजार समितीचा फायदा

लासलगाव बाजार समितीत वारंवार कांदा लिलाव बंद ठेवला जात आहे. परंतु उपबाजार विंचूर येथील कांदा बाजार सुरु आहे. यामुळे गेल्या चार महिन्यांत लासलगाव मुख्य कांदा आवारापेक्षाही विंचूरमध्ये जास्त कांदा येत आहे. या ठिकाणी लासलगावपेक्षा 1 लाख 14 हजार क्विंटलने अधिक कांद्याचे लिलाव झाला आहे. विंचूर बाजार समितीच्या कांदा लिलावात ही ऐतिहासिक नोंद आहे.

हे सुद्धा वाचा

विंचूरने घेतली आघाडी

लासलगाव येथे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि 13 नोव्हेंबरपर्यंत कांदा व्यापाऱ्यांनी अनेक दिवस कांद्याचे लिलाव बंद ठेवले. परंतु विंचूर येथे या दिवसांत कांदा व्यापारी आणि कामगार यांनी कांदा लिलावात सातत्य ठेवले. यामुळे शेतकरी लासलगाव ऐवजी विंचूर बाजारात कांदा विक्रीसाठी आणत आहे. या बाजार समितीत 8 लाख 11 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. आता येणाऱ्या दिवसांत अधिक कांद्याचे लिलाव करुन ही आघाडी कायम ठेवली जाईल, असे लासलगाव बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे यांनी सांगितले.

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.