AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट, बाजारभाव कोसळले अन् प्रतवारी खराब

यंदा उन्हाळी कांद्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसला आहे. तसेच यंदा कांद्याचे दर कोसळले आहे. एप्रिल महिन्यात पडलेल्या उन्हामुळे शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची प्रतवारी खराब होत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट, बाजारभाव कोसळले अन् प्रतवारी खराब
onion
| Updated on: Apr 26, 2025 | 2:16 PM
Share

नाशिक जिल्हा कांद्याची बाजारपेठ म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. नाशिकमधील लासलगाव कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे. कांद्याचे सरासरी बाजार भाव आठशे ते एक हजार रुपयांपर्यंत खाली कोसळले आहे. वाढत्या उन्हामुळे शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी खराब होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

यंदा उन्हाळी कांद्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसला आहे. तसेच यंदा कांद्याचे दर कोसळले आहे. एप्रिल महिन्यात पडलेल्या उन्हामुळे शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची प्रतवारी खराब होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता कांदा उत्पादक शेतकरी आपला कांद्याची प्रतवारी करुन साठवणूक करत आहेत. तसेच ज्यावेळेस कांद्याच्या बाजारभावात वाढ होईल, त्यावेळेस हा साठवणूक केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी आणला जाईल, असे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहे.

मागील आठवडाभरातील राज्यात कांद्याची आवक 2 लाख 37 क्विंटल झाल होती. यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 1 लाख 44 हजार क्विंटलची आवक झाली. या आठवड्यात उन्हाळी कांद्याला कमीत कमी 840 रुपये तर जास्तीत जास्त 1250 रुपये दर होता.

दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी लासलगाव बाजार समितीत भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत केंद्र सरकार टीका केली होती. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळेच कांद्याच्या बाजारभावावर परिणाम होत आहे. गेल्यावेळी प्रोडूसर कंपन्यांमार्फत खरेदी करत मोठा भ्रष्टाचार झाला होता. त्यामुळे नाफेडने थेट बाजार समितीत उतरून कांद्याची खरेदी केली पाहिजे. शेतकऱ्यांजवळ असलेली विजेची थकबाकी ही शेतकऱ्यांचीच आहे का? तितकी वीज शेतकऱ्यांनी वापरली आहे का? त्याची तपासणी केली पाहिजे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.