AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांवर संकट, कांद्याच्या दरात मोठी घसरण, निर्यात पूर्णपणे ठप्प

नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर गडगडले असून शेतकऱ्यांवर संकट आले आहे. कांदा 1 हजार रुपये क्विंटलपर्यंत घसरला आहे. बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

शेतकऱ्यांवर संकट, कांद्याच्या दरात मोठी घसरण, निर्यात पूर्णपणे ठप्प
onion
| Updated on: May 11, 2025 | 9:02 AM
Share

अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर शेतमालाच्या दराचे संकट आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या संकटामुळे भर पडली आहे. आता शेतकऱ्यांचा कांदा हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. आता नाफेडकडून सुरु होणाऱ्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर गडगडले असून शेतकऱ्यांवर संकट आले आहे. कांदा 1 हजार रुपये क्विंटलपर्यंत घसरला आहे. बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच भारताने पाकिस्तानसोबत होणारी निर्यात बंद केली. त्यामुळे कांद्याचे दर घसरले. तसेच बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे कांदा निर्यातीत घट झाली आहे. तसेच बांगलादेशात 30 टक्क्यांनी अधिक उत्पादन झाले आहे.

नाफेड एनसीसीएफ यांनी अद्याप कांदा खरेदी सुरु झाली नाही. नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा कधी सुरु होते, त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कांद्याची आवक जास्त आणि बाजारात कमी मागणी अशी परिस्थिती सध्या आहे. देशांतर्गत कांदाचा पुरवठा वाढल्याने थेट कांदा दरावर परिणाम आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला 1151 रुपये दर मिळाला. नाशिक बाजार समितीत हा दर 900 रुपये होता. येवला बाजार समितीत केवळ 851 रुपये दर मिळाला. मनमाड, पिंपळगाव बसवंत बाजारात 1100 रुपये कांद्याचा दर राहिला.

देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. आशिया खंडात लासलगाव कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परंतु गेल्या महिन्याभरात नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्याचा फटका कांद्या उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला. अवकाळी पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा, कांदा बियाणे तसेच आंबा पिकाला फटका बसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.