सायकलवर सायंकाळचा फेरफटका मारायला गेला, रात्रीचे दहा वाजले तरी शुभम आलाच नाही, वडील घराबाहेर शोधण्यासाठी निघाले आणि…
आपल्यासोबत कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरोसा नाही. बुलडाण्यात एका कुटुंबाने त्यांच्या घरातील 24 वर्षांचा तरुण गमावला आहे (24 year old youth death in accident at Buldhana Khamgaon).
बुलडाणा : आपल्यासोबत कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरोसा नाही. बुलडाण्यात एका कुटुंबाने त्यांच्या घरातील 24 वर्षांचा तरुण गमावला आहे. विशेष म्हणजे मृतक तरुणाची काहीच चूक नसताना अपघातात त्याचा हकनाक बळी गेला आहे. तो सायकलीने घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी निघाला होता. पण एका अज्ञात वाहन चालकाने त्याला धडक दिली. या दुर्घटनेत तरुण जागीच मृत्यू झाला. तर तरुणाला धडक देणारा अज्ञात वाहनचालकाने धुम ठोकली. तो घटनास्थळापासून पळून गेला. या घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांना टाहू फोडत आक्रोश केला (24 year old youth death in accident at Buldhana Khamgaon).
नेमकं काय घडलं?
बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील गारडगाव येथील 24 वर्षीय शुभम गीते या सायकलस्वाराला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने उडविल्याने अपघात झाल्याची घटना रात्री घडलीय. या घटनेमध्ये गारडगाव येथील शुभम गीते याचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. दुसरीकडे मृतक शुभमच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्तबगार, तरुण मुलाचं निधन झाल्यामुळे कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे (24 year old youth death in accident at Buldhana Khamgaon).
वडील शुभमला शोधण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर मृत्यूची माहिती मिळाली
खामगाव तालुक्यातील गारडगाव येथील 24 वर्षीय शुभम गीते हा दररोज सायंकाळी गारडगाव येथून आपल्या सायकलीने खामगाव परिसरात फिरायला जात असतो. तो काल (10 जुलै) सायंकाळी सायकलीने फिरायला गेला होता. मात्र रात्री 10 वाजेपर्यंत शुभम घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे वडील बळीराम गीते हे त्याला शोधण्यासाठी निघाले. या दरम्यान त्यांना फोनवर माहिती मिळाली की, त्यांचा मुलगा शुभमचा जनुना चौकात अपघात झाला असून यात त्याचा मृत्यू झाला आहे.
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
मृतक शुभमचे वडील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीसही घटनास्थळी दाखल होते. ते घटनास्थळाचा पंचनामा करत होते. तसेच शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी शुभमच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला.
संबंधित बातमी :
महामार्गावर ट्रकची भीषण धडक, अपघातात कारचा चुराडा, चौघांचा मृत्यू