पोटनिवडणुकीच्या तोंडावरच कोल्हापुरात गोवा बनावटीचा 25 लाखाचा मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई
कोल्हापूर : कोल्हापूर शहर तसेच करवीर तालुक्यातील (Karavir Taluka) मोरेवाडी परिसरात 25 लाख 86 हजार 920 रुपयाची गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह (Goa made liquor) एकूण 30 लाख 67 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात ही कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कोल्हापूरमधील (Kolhapur) कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील […]
कोल्हापूर : कोल्हापूर शहर तसेच करवीर तालुक्यातील (Karavir Taluka) मोरेवाडी परिसरात 25 लाख 86 हजार 920 रुपयाची गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह (Goa made liquor) एकूण 30 लाख 67 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात ही कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कोल्हापूरमधील (Kolhapur) कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील सद्दामहुसेन आदम मुल्ला याला अटक करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीच्या तोंडावरच ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळासह सगळीकडे या कारवाईची चर्चा सुरु आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाला मोरेवाडी रोड येथील अक्षरधाम समता कॉलनीतील प्लॉट नंबर १६ मधील इमारतीत काही इसम बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा करुन कोल्हापूर शहर व परिसरात विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरुन गुरुवारी उत्पादन शुल्कच्या पथकाने मोरेवाडी येथे छापा टाकला. उत्पादन शुल्काच्या पथकाने ज्यावेळी ही धाड टाकली त्यावेळी इमारतीमधील पहिल्या खोलीमध्ये व इमारतीखाली उभ्या असलेल्या ट्रकमध्येदेखील मद्याचा साठा आढळून आला.
इमारतीमध्येही मद्य आणि ट्रकमध्येही
या प्रकरणात इमारतीसमोर थांबलेल्या ट्रक (MH 09 EM 8207) मध्ये सुद्धा मद्यसाठा आढळून आल्याने ट्रकही ताब्यात घेण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे याचा तपास सुरु असून सापडलेला मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे.
पोटनिवडणूकीच्या तोंडावरच साठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरात हा मोठा मद्यसाठा जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आल्यानंतर यामध्ये गोवा बनावटीची साधारण 30 लाख 67 हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे का याचा तपास सुरु असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूरातील पोटनिवडणुकीच्या काळातच ही कारवाई केल्यानंतर राजकीय वर्तुळातही या कारवाई उलटसुलट चर्चा चालू झाली आहे.
ही कारवाई निरीक्षक संभाजी बरगे, सहायक निरीक्षण जगन्नाथ पाटील, अंकुश माने, मिलिंद गरुड, गिरीश करचे, विजय नाईक, नारायण रोटे, सचिन काळेल, बबन पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले.
संबंधित बातमी
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवली, पण पसंती सत्यजीत कदमांना