Video : जिवाभावाचा माणूस… गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत चक्क राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो छापण्यात आला आहे.

Video : जिवाभावाचा माणूस... गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 8:15 AM

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली. नंतर पवारांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजीनामा मागे घेतला आणि सर्व भूकंप रोखले. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीवरील फुटीचं मळभ दूर झाल्याची चर्चा होती. मात्र, ही चर्चा असतानाच आता एका जाहिरातीमुळे दुसऱ्या नव्या चर्चेने जोर धरला आहे. भाजप नेत्याच्या वाढदिवसाच्या या जाहिरातीत चक्क अजित पवार आणि शरद पवार यांचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका दैनिकात महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी जाहिरात छापण्यात आली आहे. ही जाहिरात पानभर आहे. या जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो छापण्यात आला आहे. सोबत शरद पवार यांचाही फोटो आहे. विशेष म्हणजे या फोटोत भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचाही फोटो आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वात मोठा फोटो

गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि सुरेशदादा जैन यांचेही फोटो आहेत. पण या सर्वांच्या फोटोमध्ये अजितदादा पवार यांचा फोटो सर्वात मोठा छापण्यात आला आहे. फडणवीस यांचा फोटोही छोटा छापण्यात आला आहे. मात्र, अजितदादांचा मोठा फोटो छापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एवढेच नव्हे तर अजितदादांच्या फोटोखाली जिवाभावाचा माणूस असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

ajit pawar

ajit pawar

शरद पवार आणि मोदी

याच जाहिरातीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो छापण्यात आला आहे. पवार-मोदींच्या फोटो खाली अजित पवार, फडणवीस आणि महाजन यांचा तिघांचा एकत्रित फोटोही छापण्यता आला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ही जाहिरात दिली आहे. त्यावर या बँकेचे चेअरमन संजय पवार यांचाही फोटो आहे. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांचाही फोटो आहे. मात्र, भाजप नेत्याच्या वाढदिवसाच्या फोटोत अजितदादा आणि शरद पवार यांचे फोटो छापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.