गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यास पुढील दोन दिवस मज्जाव, अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर आदेश
कोरोना नियमांमध्ये शिथिलता (Corona Restrictions Relaxed) मिळाल्यानंतर मंगळवारी येणारी अंगारकी ही पहिलीच अंगारकी संकष्टी (Angaraki Sankashti) असणार आहे. त्यापार्श्वभूमीवर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये भाविकांना गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यास पुढील दोन दिवस पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरु झालीये.
रत्नागिरी : कोरोना नियमांमध्ये शिथिलता (Corona Restrictions Relaxed) मिळाल्यानंतर मंगळवारी येणारी अंगारकी ही पहिलीच अंगारकी संकष्टी (Angaraki Sankashti) असणार आहे. त्यापार्श्वभूमीवर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये भाविकांना गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यास पुढील दोन दिवस पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरु झालीये.
सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय
मंगळवारी येणाऱ्या अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस भाविकांना गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. जवळपास एक ते सव्वा लाख भाविक अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने गणपतीपुळेला येणार असल्यानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी म्हटलं आहे.
शिवाय, यावेळी भाविकांना कोरोना नियमांचं पालन करणं देखील बंधनकारक असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी काही भरारी पथकं देखील नेमली जाणार असून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे, असंही ते म्हणाले.
दोन डोस झालेल्या स्थानिक व्यापाऱ्यांनाच प्राधान्य
गणपतीपुळे येथे अंगाकरी संकष्टी निमित्त बाहेरुन देखील मोठ्या प्रमाणात व्यापारी, छोटे – मोठे स्टॉलधारक येत असतात. पण, यावेळी मात्र त्यांना मंदिर परिसरात स्टॉल लावता येणार नसून स्थानिक व्यापाऱ्यांचे दोन डोस झालेल्या असल्याल त्याला प्राधान्य दिलं जाईल, असंही बी. एन. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. त्याशिवाय, बाहेरुन येणाऱ्यांना प्रसादाचे स्टॉल लावण्यास देखील मज्जाव करण्यात आला आहे.
Nashik| जिल्ह्यात 447 कोरोना रुग्ण; 340 तृतीयपंथीयांचे लसीकरण पूर्णhttps://t.co/Qb7xScBKrI#Nashik|#Corona|#MunicipalCorporation|#HealthDepartment
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 19, 2021
संबंधित बातम्या :
Nashik| जिल्ह्यात 488 कोरोना रुग्ण; नाशिक महापालिका क्षेत्रात 198 जणांवर उपचार सुरू
लसीकरणाचे नियम डावलले, औरंगाबादमध्ये बाबा पेट्रोल पंप सील, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई