मोठी बातमी! बच्चू कडू यांचा अपघात, रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक; तब्येत कशी आहे?

आमदार बच्चू कडू हे आज पहाटे 6 ते 6.30च्या दरम्यान रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी सुस्साट वेगात आलेल्या दुचाकीने बच्चू कडू यांना जोरदार धडक दिली.

मोठी बातमी! बच्चू कडू यांचा अपघात, रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक; तब्येत कशी आहे?
बच्चू कडू Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 1:26 PM

अमरावती: प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला आहे. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

आमदार बच्चू कडू हे आज पहाटे 6 ते 6.30च्या दरम्यान रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी सुस्साट वेगात आलेल्या दुचाकीने बच्चू कडू यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे बच्चू जागेवरच कोसळले. त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला. डोक्याला मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला चार टाके मारण्यात आले. त्यांच्या डोक्याला आणि पायाला बँडेज लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून चिंतेचं काही कारण नसल्याचं सांगण्यात आलं.

दुचाकीस्वाराने धडक दिल्याने बच्चू कडू हे रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला. या अपघातात बच्चू कडू यांना मुक्कामार लागल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, दुचाकीस्वाराबाबतची काहीच माहिती मिळाली नाही. पोलीस सूत्रांनीही याबाबत काहीच माहिती दिली नाही.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या आधी आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. गोरे यांच्या कारला मध्यरात्री अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्याही गाडीला अपघात झाला. आता बच्चू कडू यांचाही रस्ता ओलांडत असताना अपघात झाला आहे.

Non Stop LIVE Update
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.