भाजपकडून अमरिश पटेल विधान परिषदेच्या रिंगणात; निवडणुकीची चुरस वाढणार?

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी भाजपने अमरिश भाई पटेल यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीला रंगत वाढली आहे.

भाजपकडून अमरिश पटेल विधान परिषदेच्या रिंगणात; निवडणुकीची चुरस वाढणार?
BJP Leader Amrish Patel
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 11:33 AM

धुळे: धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी भाजपने अमरिश भाई पटेल यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीला रंगत वाढली आहे. या निवडणुकीत अमरिश भाई पटेल बिनविरोध येतात की त्यांना कडवी झुंज द्यावी लागते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात खलबत्ते सुरू झाली आहेत. भाजपने या ठिकाणी आपला उमेदवारी जाहीर करून सर्वच राजकीय पक्षांच्या कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाकडून विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही.

मात्र भाजपाचे आमदार शिरीष शिरीष चौधरी यांच्या नावाची चर्चा सध्या मतदारसंघांमध्ये होत आहे. ही जागा काँग्रेसला सुटली तर काँग्रेसकडून भाजपाच्या माजी आमदार शिरीष चौधरी यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. चौधरी आज काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. मात्र गेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडे उमेदवार विजयी होईल इतके मत असतानाही भाजपा उमेदवाराचा विजय झाला होता. या वेळेस महाविकास आघाडीचे मतदान वाढले आहे. मात्र उमेदवार कोण असेल यावर सर्व गणिते अवलंबून राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

चौधरी काय करणार? सर्वांचं लक्ष लागलं

दरम्यान, शिरीष चौधरी हे भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्यास तो भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे अमरिशभाई पटेल यांच्या वर्चस्वालाही धक्का पोहोचू शकतो असं सांगितलं जातं. त्यामुळे चौधरी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय मतांची बेगमी असूनही काँग्रेस त्याचा कसा वापर करून घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्यावेळी नेमकं काय घडलं?

अमरिश पटेल भाजपमध्ये आल्यानंतर धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत पटेल यांचा दणदणीत विजय झाला होता. आघाडीची 115 मते फुटल्याने पटेल यांचा विजय झाला होता. या निवडणुकीत विजयी झाले असले तरी त्यांचा कार्यकाळ 12 महिन्यांचा होता. या निवडणुकीत अमरिश पटेल यांना 332 तर विरोधी उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली. त्यामुळे अमरिश पटेल यांनी 234 मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय होता. यापूर्वी त्यांनी 2009, 2015 आणि आता 2020 मध्ये विजय मिळवला होता.

पुनरावृत्ती होणार?

या निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल 115 मतं फुटली. जर आकड्यातच बोलायचं झालं तर भाजपाचे 199 तर महाविकास आघाडीचे 213 इतकी मतं होती. मात्र महाविकास आघाडीच्या 115 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाल्याने अभिजित पाटील यांचा पराभव झाला आणि भाजपाचे अमरिश पटेल मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. अमरिश पटेलांच्या या विजयाने महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होते. त्यामुळे आता होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

धुळे- नंदुरबार निवडणुकीतील संख्याबळ

भाजप – 199 काँग्रेस – 157 राष्ट्रवादी – 36 शिवसेना 22 एमआयएम – 9 समाजवादी पार्टी – 4 बहुजन समाज पार्टी – 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1 अपक्ष – 10

संबंधित बातम्या:

कोकणात धुमशान! भास्कर जाधवांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल, सेना पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशावरून कलगीतुरा

VIDEO | फूटेज असूनही वडील खोट्या केसमध्ये तुरुंगात, दादाचा पत्ता नाही, बदलापूरच्या तरुणीचा ठाकरे सरकारकडे टाहो

Controversial Health Exam: तक्रारींच्या निराकरणानंतरच नियुक्त्या; आरोग्य मंत्र्यांचे आदेश

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.