VIDEO: अमरावतीत हजारो लोक रस्त्यावर आले, पोलिसांना सूचना गेल्या ‘हे होऊ द्या’; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील आघाडी सरकारवर धक्कादायक आरोप केले आहेत. अमरावतीत हजारो लोक रस्त्यावर आले होते.
अमरावती: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील आघाडी सरकारवर धक्कादायक आरोप केले आहेत. अमरावतीत हजारो लोक रस्त्यावर आले होते. त्यावेळी पोलिसांना तात्काळ सूचना गेल्या. हे होऊ द्या, असं पोलिसांना सांगितलं गेलं, असा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अमरावती हिंसाचारातील पीडितांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या हिंसाचारावरून सोमय्या यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्ले चढवले. 12 तारखेला हजारो लोकं रस्त्यावर गुपचूप येऊ शकतच नाही. पोलिसांना सूचना दिली होती हे होऊ द्या, असा दावा सोमय्या यांनी केला.
मिरवणुका कुणाच्या आशीर्वादाने निघाल्या
आघाडी सरकार 12 तारखेचा हिशोब का देत नाही? हे सरकार 12 तारखेचं त्याचं विस्मरण करत आहे. त्या दिवशी तीन ठिकाणी मिरवणुका निघाल्या. या मिरवणुका यांच्या आशीर्वादने निघाल्या होत्या का? याची चौकशी झाली पाहिजे. कुठे मशीद पेटवण्यात आली? त्रिपुरात का? कुणी अफवा फैलावली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या घटनेचा शोध का घेत नाही?, असे सवालही त्यांनी केला.
घोटाळे काढतो म्हणून जिल्हाबंदी
तसेच मला अमरावतीत यायचं होतं. पण मला थांबवण्यात आलं. हे अजीबोगरीब सरकार आहे. यांचे मंत्री घोटाळे करतात. मी घोटाळे उघड केले तर जिल्हाबंदी होते. नगरमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो. मला तिकडेही जाण्यास बंदी करण्यात आली होती, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
मुंबई दंगलीची पुनरावृत्ती होतेय
1992-93 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्या सरकारने जे केलं. ते ठाकरे सरकार रिपीट करत आहे. काँग्रसे एनसीपीला सांगतो, भले बाळासाहेब आज आपल्यात नाहीत. पण त्यावेळी आम्ही एकत्रित होतो. बाळासाहेबांच्या नेतृत्वात हिंदुत्व वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर होतो. त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्रीपदासाठी जर समझोता करत असतील तर आम्ही ते चालू देणार नाही. महाराष्ट्रात हिंदूवर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची असणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
VIDEO : महत्त्वाच्या घडामोडी | 30 November 2021 #FastNews #News pic.twitter.com/AQHCCsHufT
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2021
संबंधित बातम्या:
Mumbai School Reopening: मुंबईत 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार, बीएमसीचा मोठा निर्णय
महापौर दालनातून टेंडरच्या फायली गायब, पालिकेतील वाझे कोण?; भाजप करणार एसीबीकडे तक्रार